AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भटक्या कुत्र्याच्या भीतीने पळाला; 18 वर्षीय तरुणासोबत वाटेतच भयंकर घडलं, बदलापुरात शोककळा

बदलापुरात 18 वर्षांच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. भटक्या कुत्र्याला घाबरून पळताना तरुणाचा जीव गेला. या घटनेने बदलापुरात खळबळ उडाली आहे.

भटक्या कुत्र्याच्या भीतीने पळाला; 18 वर्षीय तरुणासोबत वाटेतच भयंकर घडलं, बदलापुरात शोककळा
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 27, 2026 | 7:40 AM
Share

मयुरेश जाधव, प्रतिनिधी : बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भटक्या कुत्र्यापासून बचाव करून पळणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. एकीकडे बदलापूर नगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आलीय. 18 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने बदलापूरकर हळहळ व्यक्त करत आहेत.

हर्षल शिंदे असं तरुणाचे नाव आहे.  हर्षल हा त्याच्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्राला सोडण्यासाठी गेला होता. याच दरम्यान एक महिला भटक्या कुत्र्यांना तिथे अन्न खाऊ घालत होती, अस सांगितले जातंय. यावेळी तिथूनच जाणाऱ्या हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे तेथीलच एक भटका कुत्रा मागे लागला. हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. परंतु याच वेळी पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे पालिकेच्या उपायोजना केवळ कागदावरच आहेत का? असा सवाल विचारत संताप व्यक्त करण्यात येतोय.

बदलापुरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर 

दरम्यान, बदलापुरात भटक्या कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रितिका करोचिया या मुलीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाला होता. रितिका ही चिमुरडी घराच्या मागे मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी तिला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. रेबीजचे दोन इंजेक्शनचा कोर्स झाल्यानंतरही रितिकाची तब्येत बिघडली होती. त्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रितिकानंतर आता 18 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून बदलापूर नगरपरिषदेला कधी जाग येणार, असा सवाल केला जात आहे. भटक्या कुत्र्याने आणखी एकाचा बळी घेतल्यानंतर बदलापूर नगरपरिषद काय अॅक्शन घेते, हे पाहावे लागेल.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला