मोठी बातमी! संसदेत डिलिमिटेशन बिल सादर होणार? सरकारने बोलावलं विशेष अधिवेशन, घडामोडींना वेग
केंद्र सरकारकडून दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. याच अधिवेशनात आता डिलिमिटेशन बिल मांडलं जाण्याची दाट शक्यता आहे. या बिलासाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव जवळपास केंद्र सरकारकडून पूर्ण झाली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारकडून दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. 30 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत लोकसभेचं अधिवेशन चालणार आहे. तर 2 आणि 3 डिसेंबरला राज्यसभेचं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे आज या विशेष अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी साडेचार वाजता काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे.
30 नोव्हेंबरपासून लोकसभेचं तर 2 डिसेंबरपासून राज्यसभेचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजजू यांनी ही माहिती दिली आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन बिल मांडलं जाण्याची दाट शक्यता आहे. डिलिमिटेशनसाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव केंद्र सरकारकडून जवळपास पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट देखील डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, तसे संकेत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे डीएमके देखील या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यात 50 टक्के जागा वाढवल्या तर डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करू असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
सध्या डिएमकेकडं 22 खासदार आहेत. त्यामुळे आता याच अधिवेशनामध्ये केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही सभागृहाचं कामकाज तीन डिसेंबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. आवश्यक सरकारी कामासाठी अधिवेशन पुन्हा बोलावण्यात आल्याची माहिती किरण रिजजू यांच्यावतीने देण्यात आली आहे.
दरम्यान दुसरीकडे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसून आलं. वीस खासदारांनी बंडखोरी करत आपला एक वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर त्यांनी नव्या पक्षात प्रवेश केला. आता हा खासदारांचा गट देखील केंद्रातील भाजप सरकारच्या या डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच विशेष अधिवेशनात आता हे बिलं मंडलं जाऊ शकतं.
