पहिल्या पत्नीचे निधन, दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट, आता प्रसिद्ध अभिनेत्याने कुटुंबासोबतही तोडले कायमचे संबंध
पवन सिंग यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे.त्याने आता एक नवी पोस्ट आणि अतिशय कठोर निर्णय घेतल्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पवन सिंग यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे.त्याने आता एक नवी पोस्ट आणि अतिशय कठोर निर्णय घेतल्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भोजपुरी सिनेमाचे पॉवर स्टार आणि बिहार भाजपचे विधान परिषद सदस्य पवन सिंह यांनी एका भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या संपूर्ण कुटुंबाशी असलेले संपूर्ण संबंध तोडले आहेत अशी पोस्ट केली आहे.
रविवारी, पॉवर स्टारने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, "जेव्हा एखादा माणूस घराच्या जगात अडकतो, तेव्हा तो सर्व वेद आणि धर्मग्रंथ विसरतो." त्यांनी पुढे लिहिले, "मी माझ्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली आहे आणि अत्यंत दुःखाने हे पोस्ट करत आहे. मी संपूर्ण भोजपुरी समाजाची मागतो. आतापासून माझे माझ्या संपूर्ण कुटुंबाशी आणि परिवाराशी कोणतेही नाते नाही."
पवन सिंह पुढे म्हणाला आहे की पवन सिंग म्हणाला, "होय, मला जन्म देणाऱ्या आईसाठी आणि माझा मोठा भाऊ रानू सिंगसाठी, मी आयुष्यभर माझ्या प्राणांचे बलिदान देईन. पवन सिंग, , तुमच्या कुटुंबाचा एक छोटासा सदस्य."
पवन सिंग यांची पोस्ट सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाली, ज्यामुळे चाहते आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी हा अचानक निर्णय का घेतला, हे अद्याप पवन सिंग यांनी स्पष्ट केलेले नाही.
पवन सिंग यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. त्यांचे पहिले लग्न २०१४ मध्ये नीलम सिंग यांच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच नीलम यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचे अक्षरा सिंग हिच्यासोबत त्याने लग्न केले . मात्र, काही वर्षांनंतर पवन सिंग आणि ज्योती सिंग यांच्या नात्यात कटुता आली, ज्यामुळे न्यायालयात घटस्फोटाचा खटला दाखल झाला आहे.