‘हर दिन 6,000 लोग…’ कॉलर ट्यूनमधील अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला कंटाळले लोक

भारतात सायबर गुन्ह्यांतील वाढत्या प्रमाणामुळे, टेलिकॉम कंपन्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जागरूकता संदेश कॉलर ट्यून म्हणून सुरू केली आहे. परंतु हा 40 सेकंदांचा संदेश प्रत्येक कॉलपूर्वी वाजणे आता लोकांना त्रासदायक वाटू लागले आहे. सोशल मीडियावर याविरुद्ध मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून, काहीजणांनी आरटीआय देखील दाखल केला आहे.

हर दिन 6,000 लोग... कॉलर ट्यूनमधील अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला कंटाळले लोक
amitabh bachchan voice
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 21, 2025 | 5:40 PM

देशातील वाढत्या डिजिटल गुन्ह्यांबद्दल जनतेला सतर्क करण्यासाठी, टेलिकॉम कंपन्यांनी कॉलर ट्यूनच्या स्वरूपात सायबर सुरक्षेची माहिती जोडली आहे. “देशातील दररोज 6000 हून अधिक लोक सायबर गुन्हेगारांमुळे कोट्यवधी रुपये गमावतात…” ही कॉलर ट्यून जागरूकतेसाठी आता प्रत्येकाच्या फोनमध्ये ऐकू येते.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून 

आता प्रत्येक कॉलपूर्वी वाजणारी ही कॉलर ट्यून मोठ्या संकटापेक्षा कमी वाटत नाही. एखाद्याला जर तातडीने कॉल करायचा असल्यास अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून ऐकल्याशिवाय त्याचा कॉल लागत नाही शिवाय कधी कधी तर या कॉलर ट्यूनमुळे समोरच्याला फोन लागला आहे की नाही हेही लक्षात येत नाही. त्यामुळे आता लोकांची हा आवाज ऐकला की चिडचिड होऊ लागली आहे.

कोरोना काळातही अशीच परिस्थिती

बरेच लोक असा दावा करतात की कीपॅडवर # किंवा 1 दाबल्याने कॉलर ट्यून थांबतो, परंतु हे खरे नाही. काही लोक यामध्ये भाग्यवान असतात, परंतु सहसा संदेश चालू राहतो.

कोरोना काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रत्येक कॉलनंतर 30 सेकंदांचा बचाव संदेश वाजवला जात होता आणि लोकांच्या मोठ्या प्रमाणात आक्षेपानंतर तो बंद करण्यात आला होता. त्या काळातही लोकांनी सरकारला असे सुचवले होते की दररोज पहिल्या कॉलपूर्वी अशी कॉलर ट्यून असणे ठीक आहे, परंतु जर ती प्रत्येक कॉलवर वाजली तर ती एक मोठी समस्या आहे.

आता सायबर गुन्ह्यांबाबत या कॉलर ट्यूनबाबतही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बंद करण्यासाठी लोक सोशल मीडियावर आवाज उठवत आहेत. अनेकांनी याबाबत आरटीआय देखील दाखल केला आहे.

हा सायबर अलर्ट आवाज काय आहे?

भारत सरकारच्या सूचनांनुसार, टेलिकॉम कंपन्या प्रत्येक आउटगोइंग कॉलपूर्वी एक चेतावणी संदेश वाजवत आहेत. या चेतावणी संदेशात, वापरकर्त्यांना संशयास्पद लिंक्स किंवा अज्ञात OTP शेअर करू नका तसेच फसव्या कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. हा ऑडिओ सुमारे 40 सेकंदांचा आहे आणि लोकांना सुरक्षित वर्तन स्वीकारण्याची सूचना देतो. त्याचा उद्देश लोकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवणे आहे, परंतु प्रत्येक कॉलच्या आधी ही कॉलर ट्यून वाजणे आता एक मोठी समस्या झाली आहे.

अमिताभ यांचा कॉलरट्यून वरील आवाजा त्रासदायक वाटू लगला 

राजस्थान पोलिस उपनिरीक्षक आरती सिंह तंवर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. खरंतर, तिने या समस्येचे निराकरण सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांच्या मते, जेव्हा कॉलच्या सुरुवातीला हा संदेश वाजायला लागतो तेव्हा कीपॅड उघडा आणि 1 दाबा. हे करताच, कॉलर ट्यून थांबते. तुम्ही 0 आणि 8 दाबून देखील ते संपवू शकता, परंतून ही ट्रीक प्रत्येकच वेळी उपयोगात पडते असं नाही. पण ही कॉलर ट्यून ऐकून ऐकून लोकं आता कंटाळली आहेत.