
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे कायमच चर्चेत असतात. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एप्रिलमध्ये लग्न केले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी मुलगी राहा हिचे नोव्हेंबरमध्ये स्वागत केले. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट आपल्या मुलीचे नाव जाहिर केले. इतकेच नाही तर मुलीच्या नावाचा अर्थ सांगतानाही आलिया भट्ट ही दिसली. मात्र, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीची एकही झलक चाहत्यांना दाखवली नाही.
रणबीर कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने धमाका केला. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह हा देखील मुख्य भूमिकेत आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे दिसले. विशेष म्हणजे चित्रपटाने धमाका केला.
सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे मुलगी राहा हिच्यासोबत विदेशात धमाल करताना दिसत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया विदेशात चांगला वेळ घालवत आहेत. सध्या रणबीर कपूर याचा विदेशातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा दिसत आहे. हा व्हिडीओ यूएस ओपन टेनिस मॅचमधील आहे.
या व्हिडीओमध्ये कॅमेरामॅन हा हॉलिवूड अभिनेत्री मॅडलिन क्लाइन हिला कॅप्चर करताना दिसत आहे. जसेही रणबीर कपूर याच्या लक्षात आले की, मॅडलिन क्लाइन हा टीव्हीमध्ये दिसत आहे, तसेच रणबीर कपूर हा त्या फेममध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, अनेकांना रणबीर कपूर याचे हे वागणे आवडले नाहीये.
एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हा प्रकार एकदम बालिशसारखा आहे. दुसऱ्याने लिहिले की, रणबीर कपूर तू इतका मोठा स्टार आहे आणि टीव्हीमध्ये दिसण्यासाठी तू अशाप्रकारे कसे वागू शकतो. दुसऱ्याने लिहिले की, हा रणबीर कपूर लग्न होऊनही सुधारला नाहीये. अजून एकाने लिहिले की, हा असूनही बालिशच आहे.
या व्हिडीओमुळे रणबीर कपूर हा लोकांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करत रणबीर कपूर याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. रणबीर कपूर याच्यासोबत हा मॅच बघण्यासाठी आलिया भट्ट ही देखील पोहचलीये. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.