दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर दिसणार एकत्र

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर दिसणार एकत्र

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी मोठ्या पडद्यावरील सर्वात हीट जोडींमधील एक आहे. नुकतेच दोघांनी लग्न केलं आहे आणि लग्नानंतर त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी इच्छूक आहेत. 2019 मध्ये असा कोणता चित्रपट नाही ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसतील. मात्र दीपिका आणि रणबीर कपूर ही जुनी जोडी लवकरच पडद्यावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे. दीपिका आणि रणबीर लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात काम करणार आहेत. लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका तसेल लीड रोलमध्ये अजय देवगण दिसणार आहे. तसेच दीपिका या चित्रपटात फीमेल लीड रोलमध्ये आहे.

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणने बॉलीवूडला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ‘बचना ऐ हसीनो’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ सारख्या चित्रपटात या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली. ही जोडी अनेक दिवस कोणत्याच चित्रपटात आतापर्यंत एकत्र दिसली नाही. रणबीर आणि दीपिका पादुकोणच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा या दोघांना एकत्र पाहण्याची अपेक्षा सोडली होती. मात्र हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याच्या वृत्तामुळे सध्या रणबीर आणि दीपिकाचे चाहते जास्त उत्साहीत आहेत.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI