
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य कराणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मुख्य म्हणजे चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला फार आवडतं. अशीच एक बातमी आता त्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीने दिली आहे. ती म्हणजे प्राजक्ता. जिने अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
या भूमिकेमुळे प्राजक्ताला पसंती, ओळखही मिळाली
प्राजक्ता गायकवाड म्हटलं की सर्वात आधी तिची भूमिका डोळ्यांसमोर येते ती म्हणजे महाराणी येसूबाईंची. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये तिने साकारलेली महाराणी येसूबाईंची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या भूमिकेमुळे तिला पसंती, ओळखही मिळाली.तसंही अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली
प्राजक्ता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली. येसूबाईंच्या भूमिकेमुळे ती अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. तिची पसंती एवढी वाढली होती की विक्की कौशलचा ‘छावा’ सिनेमा रिलीज झाला, त्यावेळी त्यातल्या येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाला आणि तिची तुलना होऊ लागली होती. प्राजक्ता गायकवाड तशी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आता तिने आता आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
प्राजक्तानं तिच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले
काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. त्या फोटोंमध्ये पाहुण्यामंडळींच्या गराड्यात प्राजक्ता बसलेली दिसत आहे. तसेच, प्राजक्तानं पारंपरिक साज केलेलाही दिसत आहे. हे फोटो पाहून प्राजक्ताचं ठरलं, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षावही सुरू केला. पण, प्राजक्तानं मात्र यासंदर्भात कोणताही खुलासा केला नव्हता. अशातच आता प्राजक्तानं तिच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करुन प्राजक्तानं चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
प्राजक्ताच्या गळ्यात मोठा हार घातलेला दिसत आहे
प्राजक्ता गायकवाडनं सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता हात जोडून उभी आहे. तिनं पारंपरिक साज केला आहे. तर, तिच्या कपाळावर हळदीकुंकू लावलेलं आहे. तर, तिच्या अवतीभवती खूप नातेवाईकही आहेत. याशिवाय प्राजक्ताच्या गळ्यात मोठा हार घातलेलाही दिसत आहे. प्राजक्ताने फोटो शेअर करत एक कॅप्शनही दिलं आहे जे पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं.
#ठरलं… असं प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं आहे
प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करताना कॅप्शन दिलंय की, “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…”. त्यासोबतच तिनं एक हॅशटॅगही दिला आहे. #ठरलं… असं प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. याचाच अर्थ प्राजक्तानं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्राजक्तानं साताजन्माची गाठ कुणासोबत बांधायचं ठरवलं आहे, याबाबत मात्र अद्याप काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे प्राजक्तानं जोडीदार म्हणून कुणाची निवड केलीय? हे मात्र जाणून घेण्यासाठी तिचे चाहते फारच आतूर आहेत. त्यामुळे प्राजकाचा होणारा जोडीदार कोण आहे याबद्दल ती कधी खुलासा करणार हे पाहण महत्त्वाचं आहे.