‘मनसे’च्या नव्या गाण्यावर प्राजक्ता माळीने धरला ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…

'करू तयारी रे, घेऊ भरारी रे... राजमुद्रा ही मिरवूया... ', 'मनसे'च्या नव्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता मळी... अभिनेत्रीचा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल

मनसेच्या नव्या गाण्यावर प्राजक्ता माळीने धरला ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...
| Updated on: Apr 03, 2023 | 10:29 AM

मुंबई : ‘रानबाजार’ फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘रानबाजार’ वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने साकारलेल्या भूमिकेला अनेकांनी विरोध केला, अनेकांनी मात्र अभिनेत्रीची कौतुकाने पाठ थोपटली. आता देखील प्राजक्ता एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनय विश्वात सक्रिय असलेली प्राजक्ता सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. नवनवीन फोटोशूट, रिल्सवर भन्नाट अदा दाखवणाऱ्या प्राजक्ताने आता ‘मनसे’च्या नव्या गाण्यावर डान्स केला आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, तिच्या व्हिडीओवर अनेक जण कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

प्राजक्ता ज्या गाण्यावर डान्स करत ते ‘मनसे’चं नवं अधिकृत गाणं आहे. ‘मनसे’च्या नव्या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फॅनपेज आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांच्या इन्स्टाग्रामवर वरुन देखील अभिनेत्रीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

 

 

अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ( prajakta mali dance on mns new song)

‘मनसे’ च्या नव्या गाण्यावर डान्स करताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हावभाव उल्लेखणीय आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या डान्सची चर्चा आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ rajthackerayfanclub या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. शिवाय व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘करू तयारी रे, घेऊ भरारी रे… राजमुद्रा ही मिरवूया… ‘ असं लिहिलं आहे.

‘मनसे’ च्या नव्या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, मनसेच्या ‘गुढीपाडवा मेळाव्या’त अवधूतने हे गाणं सर्वांसमोर सादर केले होते. गाण्याला हितेश मोदक यांनी संगीत दिलं असून मंदार चोळकर या गाण्याचे गीतकार आहेत. जेव्हा ‘गुढीपाडवा मेळाव्या’ हे गाणं सादर करण्यात आला, तेव्हा सर्वांमध्ये उत्साह दाटून आला…

प्राजक्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये प्राजक्ता अव्वल स्थानी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमासाठी प्रतीक्षेत असतात. सध्या सर्वत्र अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचीच चर्चा आहे.