पूजा सावंतच्या साखरपुड्यात सेलिब्रीटींची धमाल, प्रार्थना बेहेरेने पोस्ट केला खास व्हिडीओ

“पूजा आणि सिड अभिनंदन...”, पूजा सावंत हिच्या साखरपुड्याची खास झलक, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने सोशल मीडियावर पोस्ट केला खास व्हिडीओ... चाहत्यांनी देखील व्हिडीओवर केला लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

पूजा सावंतच्या साखरपुड्यात सेलिब्रीटींची धमाल, प्रार्थना बेहेरेने पोस्ट केला खास व्हिडीओ
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 2:54 PM

मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : ‘दगडी चाळ’, ‘चपाछपी’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘क्षणभर विश्रांती’ यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री पूजा सावंत हिने खासगी आयुष्यातील नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. पूजा सावंत हिने सिद्धेश चव्हाण याच्यासोबत साखरपुडा उरकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने देखील पूजाच्या साखरपुड्यातील एक खाल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

प्रार्थना हिने अनेक सेलिब्रिटी मित्र-मैत्रीणींसोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडीओ पोस्ट करत पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “पूजा आणि सिड अभिनंदन” असं प्रार्थना हिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. प्रार्थना हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत पूजा आणि सिद्धेश यांना शुभेच्छा देत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रार्थना हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आणि तिच्या पतीसोबत अनेक कलाकार देखील दिसत आहेत. भूषण कडू, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी महाजनी, श्रेयस सावंत, रुचिरा सावंत, सौमिल शृंगारपुरे असे अनेक कलाकार दिसत आहे. सोशल मीडियावर प्रार्थना हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी पूजा हिने सोशल मीडियावर सिद्धेश याच्यासोबत फोटो पोस्ट करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली. तेव्हा देखील पूजा आणि सिद्धेश यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. आता अभिनेत्रीने साखरपुडा उरकला आहे.

पूजा हिने देखील साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हिरव्या रंगाची साडी, नथ, दागिने… नवरीच्या लूकमध्ये पूजा प्रचंड सुंदर दिसत आहे. पूजा हिने पोस्ट केलेले फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पूजा हिने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत सिद्धेश याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.