
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अभिनेता श्रेयस तळपदे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेत प्रार्थना बेहेरे हिने परीच्या आईची भूमिका साकारली होती. बालकलाकार मायरा वायकुळ हिने छोट्या परीच्या भूमिकेला न्याय दिलेला. या भूमिकेनंतर मायरा हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली. तर अभिनेता श्रेयस तळपदे याने यश हे पात्र साकारले होतं. तीघांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
मालिका गाजल्यानंतर सर्वत्र ‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या चर्चा सुरु झाल्या. पण काही काळानंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आजही परी, नेहा आणि यश यांना चाहते विसलेले नाहीत. त्यामुळे छोट्या पडद्यावर गाजलेलं हे त्रिकूट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीय आहे.
अभिनेता श्रेयस याने स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. श्रेयस याने वाढदिवशी आगामी सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. म्हणून आता सिनेमाच्या माध्यमातून तीच केमिस्ट्री आता पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रेयस तळपदे प्रस्तूत अॅफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे.
नारी सामर्थ्याची गाथा दाखवणाऱ्या सिनेमाचं नाव ‘मर्दिनी’ असं आहे… तर सिनेमात नारी सामर्थ्याची गाथा दाखवण्यात येणार आहे. सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत श्रेयस म्हणाला, ‘प्रत्येक महिषासुरासाठी… एक ‘मर्दिनी’ जन्म घेतेच… ‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ पासून जवळच्या चित्रपटगृहात’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस याच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे.
मालिकेनंतर श्रेयस, प्रार्थना आणि मायरा यांना सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या तिघांसोबत सिनेमात जितेंद्र जोशी, अभिजीत खांडकेकर, राजेश भोसले यांची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. तर दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारला जात आहे.