मुलासाठी प्रयत्न करत होतो, 2 मिसकॅरेज झाले…प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ
Actress On Her Miscarriage : प्रसिद्ध अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

रावी गुप्ता एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. 'क्योंकी सास भी कभी बहू थी २' या गाजलेल्या मालिकेत दामिनीची भूमिका साकारून तिनं एक विशेष स्थान मिळवलं.
झूमला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीनं तिच्या आयुष्याबद्दल अनेक गुपितं उघड केली. अभिनेत्रीनं तिच्या गर्भपाताबद्दलही मनमोकळेपणाने सांगितलं.
रावी गुप्तानं खुलासा केला की, तिचा मुलगा अगस्त्याला जन्म देण्यापूर्वी तिचे दोन गर्भपात झाले होते. अभिनेत्री रावी गुप्ता म्हणाली, 'मी मुद्दाम करिअर ब्रेक घेतला नाही. आम्ही मुलासाठी प्रयत्न करत होतो. त्यावेळी मी खूप संघर्ष करत होते. माझे काही गर्भपात झाले होते. तो काळ खूप वेदनादायक होता.'
'मी भावनिकदृष्ट्या खूप काही सहन करत होते. मी काम करणं थांबवलं. त्यावेळी मला काहीही करण्याची इच्छा नव्हती.' रावीनं सांगितलं की, दोन गर्भपातानंतर ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिनं तिच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. मुलाच्या जन्मानंतर, तिनं कामातून ब्रेक घेतला कारण, तिला फक्त आपल्या मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करायचं होतं.
रावी गुप्ताच्या कामाबद्दल बोलायचं तर तिनं 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'नागिन ५', 'अदालत', 'रावण', 'विरासत' यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.