Shilpa Shetty | ‘अम्ही विभक्त झालो…’, राज कुंद्रा – शिल्पा शेट्टी यांच्यात वादाची ठिणगी?

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा यांचा होणार घटस्फोट? राज याच्या ट्विटने वेधलं सर्वांचं लक्ष, म्हणाला, 'आम्ही विभक्त झालो आणि...', राज कुंद्रा याच्या ट्विटनंतर सर्वत्र चर्चांना उधाण. बॉलिवूडमध्ये होणार आणखी एक घटस्फोट?

Shilpa Shetty | अम्ही विभक्त झालो..., राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्यात वादाची ठिणगी?
| Updated on: Oct 20, 2023 | 9:51 AM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तुरुंगात असताना शेल्पा शेट्टी हिने अनेक वाईट प्रसंगांचा सामना केला. शिल्पा कायम पतीसाठी पुढाकार घेताना दिसली. या प्रकरणावर लवकरच UT69 सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. दोघांमध्ये वादाची ठिकणी पडल्याची चर्चा रंगली आहे. राज कुंद्रा याने केलेल्या ट्विटमुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र राज आणि शिल्पा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

राज कुंद्रा ट्विट करत म्हणाला, ‘आम्ही विभक्त होत आहोत आणि कृपया आम्हाला या कठीण परिस्थितीत वेळ द्या…’ पण राज याने ट्विट कोणासाठी केलं कळू शकलेलं नाही. कारण राज याने कुठेच पत्नी शिल्पा हिचं नाव लिहिलेलं नाही. पण सोशल मीडियावर राज – शिल्पा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

राज कुंद्रा याच्या ट्विटवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘विभक्त झाले आहात म्हणजे घटस्फोट?’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘धक्कादायक बातमी आहे…’ तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं ‘दोघे नाटक करत आहेत’ एवढंच नाही तर, सर्व काही प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी सुरु अलल्याचं वक्तव्य देखील चाहत्यांनी केलं आहे.

यावर अद्याप शिल्पा शेट्टी हिने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, राज कुंद्रा तुरुंगात असताना शिल्पा शेट्टी पतीकडून घटस्फोट घेईल अशी चर्चा देखील रंगली होती. पण तुरुंगातून आल्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. सध्या सर्वत्र राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

कधी प्रदर्शित होणार UT69 सिनेमा?

सिनेमा UT69 चा ट्रेलर १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. ज्यामध्ये राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केसमुळे तुरुंगात जाताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये, मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात राज कुंद्रा याचे कपडे देखील उतरवण्यात आले होते. त्याला चांगलं जेवण देखील मिळत नव्हतं. एवढंच नाही तर, शिल्पा हिला परिस्थितीची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली. सिनेमा 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.