Rakhi Sawant: ‘हा लव्ह जिहादच, जर आदिलने लग्न स्वीकारलं नाही तर..’; म्हणत ढसाढसा रडू लागली राखी सावंत

लग्नाबद्दल बोलताना राखी सावंतला कोसळलं रडू; म्हणाली "माझ्याच नशिबी इतकं दु:ख का?"

Rakhi Sawant: हा लव्ह जिहादच, जर आदिलने लग्न स्वीकारलं नाही तर..; म्हणत ढसाढसा रडू लागली राखी सावंत
Rakhi Sawant
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 15, 2023 | 10:42 AM

मुंबई: टेलिव्हिजनवरील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत तिने धर्मांतर करून लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र लग्नाचे फोटो व्हायरल होताच आदिलने लग्नास मानण्यास नकार दिला. त्यामुळे राखीला मोठा धक्का बसला आहे. आदिलने जर हे लग्न मानलं नाही तर हा लव्ह जिहाद असेल, असं राखी म्हणाली.

राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांनी सात महिन्यांआधीच निकाह केल्याचं त्यातून स्पष्ट झालं. कारण व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये राखी आणि आदिलच्या मॅरेज सर्टिफिकेटचाही समावेश होता. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने धर्म परिवर्तन केलं. राखीने तिचं नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवलं. मात्र आदिलने हे मानण्यास साफ नकार दिला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी बोलताना राखीला रडू कोसळलं. “आदिलने मला स्वीकारलं नाही तर हे लव्ह-जिहादच आहे. जर त्याने माझा स्वीकार केला तर हा लव्ह-मॅरेज असेल, निकाह असेल. मी साफ मनाने हा निकाह केला होता. मी अल्लाहकडे विनंती करते की आदिलने हे लग्न स्वीकारावं किंवा मग अल्लाहने माझा जीव घ्यावा. आता हा कलंक मला सहन होत नाही”, असं ती म्हणाली.

लग्नाविषयी राखी माध्यमांसमोर येऊन स्पष्ट बोलताना दिसतेय. तर दुसरीकडे आदिल यावर प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे. आदिल या लग्नाला नकारही देत नाहीये आणि राखीला पत्नी म्हणून स्वीकारतही नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून राखी बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. राखीच्या आईला कॅन्सरनंतर आता ब्रेन ट्युमरचं निदान झालं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us