Rakhi Sawant विमानतळावर ‘या’ क्रिकेटरला ओळखू शकली नाही; म्हणाली, ‘कोण आहे…’

ज्याला संपूर्ण जग ओळखतं 'त्या' प्रसिद्ध क्रिकेटरला ओळखत नाही राखी सावंत; व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही ड्रामा क्विनला म्हणाल...; क्रिकेटरच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया

Rakhi Sawant विमानतळावर या क्रिकेटरला ओळखू शकली नाही; म्हणाली, कोण आहे...
| Updated on: Mar 24, 2023 | 1:02 PM

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखी कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल माध्यमांसमोर मोठे खुलासे करताना दिसते. राखी हिने पती आदिल खान (Adil Khan Durrani) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे आदिल सध्या तुरुंगात आहे. राखी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी लंडनमधून सुट्ट्यांचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा मुंबत आली असल्याचं चित्र दिसत आहेत. राखीचे फोटो क्लिक करत असताना पापाराझींनी तिला क्रिकेटर केएल राहुल याच्याबद्दल विचारलं. पण तेव्हा राखी प्रसिद्ध क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) याला ओळखू शकली नाही. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चत आहे. तिच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नुकताच अभिनेत्री विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होते. तेव्हा पापाराझी राखीला म्हणाले, ‘तुझ्या बाजूच्या कारमध्ये केएल राहुल आहे.’ यावर राखी म्हणाली, ‘कोण केअल राहुल?’ राखी असं म्हणाल्यानंतर पापाराझी यांनी तिला केएल राहुलची ओळख करुन दिली. ते म्हणाले, ‘क्रिकेटर केएल राहुल… सुनील शेट्टी यांचे जावई…’ सध्या राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

 

 

राखी हिच्या बद्दल सांगायचं झालं तर, ड्रामा क्विन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चत असते. याआधी पती आदील खानसोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. शिवाय एका व्हिडीओमध्ये तिने दुबईमध्ये असलेल्या संपत्तीचा देखील खुलासा केला होता. हाती सिनेमा, मालिका नसताना देखील राखी कोट्यधींची कमाई करते.

काही दिवसांपूर्वी राखीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. तेव्हा राखी पापाराझींना म्हणाली, ‘दुबई याठिकाणी राखी सावंत हिची अकॅडमी सुरु झाली आहे. दुबईमध्ये मी आणखी एक घर देखील घेतलं आहे. एक नवी गाडी देखील घेतली आहे..’ ज्यानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.

रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ ३७ कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते. बिग बॉस तर कधी डान्स शोमध्ये राखी सावंत दिसते. याच शोच्या माध्यमातून राखी कमाई करते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी राखी प्रचंड रॉयल आयुष्य जगते. सध्या सर्वत्र राखी सावंत हिचीच चर्चा आहे.