
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललीत मोदी (Lalit Modi) यांच्या डेटिंगच्या बातमीने सगळीकडेच हवा केली आहे. सध्या दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. याबाबात आज अभिनेत्री राखी (Rakhi Sawant) सावंतला विचारण्यात आलं. तर तिने आपल्या अंदाजातयावर प्रतिक्रिया दिली आहे. राखी सावंत सकाळी मुंबईतील तिच्या जिमबाहेर नवीन केसांच्या लूकमध्ये दिसली. राखी सावंतने मोठा तपकिरी पिक्सी कट हेअर विग घातला होता. गेसचा टी-शर्टही घातला होता. राखी वर्कआउटसाठी जात असताना पापाराझींनी तिला थांबवले आणि सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्यावर प्रतिक्रिया विचारली. राखी सावंत म्हणाली की सुष्मिता आणि ललित मोदी यांच्यातील नात्याबद्दल मला धक्का बसला आहे, पण मी म्हणेन की दोघांची प्रेमकहाणी खूप सुंदर आहे. मात्र एवढेच बोलून थांबेल ती राखी सावंत कसली, तिने थेट मोदी काही करत का नाहीत? असा सवाल यावेळी केला आहे.
नीरव मोदी, विजय माल्या आणि इतर अनेकजण देशातला पैसा घेऊन बाहेरच्या देशात पळून गेले. प्रत्येकजण गुन्हा करतो आणि देश सोडून जातो, यावर मोदीजी काही करत का नाहीत? असा सवाल उपस्थित केला आणि एवढेच म्हणत राखी सावंतने चाहत्यांसोबत सेल्फी काढला आणि जिममध्ये गेली. राखी सावंत ही एकमेव अभिनेत्री आहे जी नेहमी बातम्यांवर प्रतिक्रिया देते. तिच्या अनोख्या अंदाजाने ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते.
आजकाल राखी सावंत दुबई बेस्ड बिझनेसमन आदिल दरानीला डेट करत आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा दूरवर आहेत. राखी आणि आदिल दोघेही एकमेकांबद्दल रिलेशिनशिपमध्ये सिरिअस आहेत. दोघेही अनेकदा त्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. राखी सावंतसोबतच आदिल दुर्रानीही चर्चेत येऊ लागला आहे. राखीने सांगितले की ती लवकरच आदिलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंतचे नाव आले की अनेकांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू नक्कीच येतं. राखी सावंतचा बिन्धास्त स्वभाव खूप मजेदार आहे. कोणतेही काम असो राखी सावंत त्यात तिचा स्वभाव नक्कीच उतरवते. राखी सावंत नेहमीच कॅमेऱ्यात हसताना दिसते. ती स्वतः हसते, लोकांनाही खूप हसवते. यावेळी तिने तिच्या हेअर लूकने लोकांचे मनोरंजन केले.