Rakhi Sawant | राखी सावंतने समोर आणलं पतीचं आणखी एक सत्य; पूर्णपणे खचली अभिनेत्री

नुकतंच राखीने सांगितलं की तिचा पती आदिल हा कोणत्याही शोरुमचा मालक नाही तर एक ड्रायव्हर आहे. गेल्या वर्षी राखीने जेव्हा आदिलची ओळख बॉयफ्रेंड म्हणून करून दिली होती, तेव्हा तिने सांगितलं होतं की आदिल हा बेंगळुरूस्थित एका शोरुमचा मालक आहे.

Rakhi Sawant | राखी सावंतने समोर आणलं पतीचं आणखी एक सत्य; पूर्णपणे खचली अभिनेत्री
Rakhi Sawant
Image Credit source: Tv9
| Updated on: Feb 24, 2023 | 11:10 AM

मुंबई : ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. राखीने काही महिन्यांपूर्वी मैसूरचा राहणारा तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी निकाह केला होता. आता पतीसंदर्भात ती दररोद नवनवीन खुलासे करताना दिसतेय. नुकतंच राखीने सांगितलं की तिचा पती आदिल हा कोणत्याही शोरुमचा मालक नाही तर एक ड्रायव्हर आहे. गेल्या वर्षी राखीने जेव्हा आदिलची ओळख बॉयफ्रेंड म्हणून करून दिली होती, तेव्हा तिने सांगितलं होतं की आदिल हा बेंगळुरूस्थित एका शोरुमचा मालक आहे.

आदिलने नवीन कार आणि दुबईत घर खरेदी केल्याचंही राखीने म्हटलं होतं. तेव्हा दोघं लाइमलाइटमध्ये आले होते. राखीने दावा केला की मे 2022 मध्ये तिने आदिलशी निकाह केला होता. दोघांनी नोंदणी पद्धतीने हा निकाह केला होता आणि त्यासाठी राखीने तिचा धर्मही बदलला होता. आता राखीने आदिलवर फसवणुकीचा, खोटं बोलल्याचा आरोप केला आहे.

ड्रायव्हर आहे राखी सावंतचा पती आदिल

मैसूरमध्ये आदिलविरोधात सुरू असलेल्या केसनंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राखीसुद्धा मैसूर पोहोचली आहे. मैसूरमधील कोर्टात गेल्यानंतर राखी तिच्या सासरच्यांनाही भेटायला गेली होती. मात्र तिथे गेल्यावर तिला समजलं की आदिलचे कुटुंबीय तिथे राहत नाहीत आणि घराला टाळा लावला होता. आता राखीचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती सांगतेय की आदिल हा ड्रायव्हर आहे आणि तो झोपडपट्टीत राहतो.

राखीने असंही सांगितलं की तिला हे माहीत नव्हतं की आदिल हा अब्बासजी यांचा ड्रायव्हर आहे. जेव्हा ती त्याचं घर बघायला गेली, तेव्हा तिला समजलं की तो झोपडपट्टीत राहतो. राखी असंही म्हणाली की तिला आदिल गरीब असल्याने कोणतीच समस्या नाही. मात्र त्याने खरं काय ते सांगितलं पाहिजे होतं, असं ती म्हणाली.