Rakhi Sawant: लग्नाच्या चर्चांदरम्यान राखी सावंतकडून आदिलसोबतचा बेडरुम व्हिडीओ शेअर; भडकलेले नेटकरी म्हणाले..

बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी निकाह केल्याचा दावा राखीने केला आहे. मात्र या कहाणीत मोठा ट्विस्ट आहे. कारण आदिलने राखीसोबतचं हे लग्न स्वीकारण्यास साफ नकार दिला आहे.

Rakhi Sawant: लग्नाच्या चर्चांदरम्यान राखी सावंतकडून आदिलसोबतचा बेडरुम व्हिडीओ शेअर; भडकलेले नेटकरी म्हणाले..
'इस्लाम कबूल करत मी फातिमा झाले', लव्ह - जिहादबद्दल राखी सावंत हिचं मोठं वक्तव्य
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2023 | 10:14 AM

मुंबई: ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचं लग्न म्हणजे चाहत्यांसाठी जणू एक कोडंच बनलंय. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी निकाह केल्याचा दावा राखीने केला आहे. मात्र या कहाणीत मोठा ट्विस्ट आहे. कारण आदिलने राखीसोबतचं हे लग्न स्वीकारण्यास साफ नकार दिला आहे. अशातच राखी मीडियासमोर ढसाढसा रडताना दिसली. तिने आदिलवर फसवणुकीचा आरोपदेखील केला. या सर्व घटनांदरम्यान आता राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर अचानक आदिल खानसोबतचा रोमँटिक बेडरुम व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते तिच्यावर भडकले आहेत.

आदिल खानने जेव्हा राखीसोबतच्या लग्नाला स्वीकारण्यास नकार दिला, तेव्हा राखी माध्यमांसमोर रडताना दिसली. “माझ्याच नशिबी इतकं दु:ख का?” असा सवाल करत ती ढसढसा रडत होती. एक दिवस आधी इतक्या दु:खात दिसणारी राखी आता अचानक आदिलसोबतचे रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करू लागल्याचं पाहून चाहते भडकले आहेत. या व्हिडीओमध्ये राखी आणि आदिल एकमेकांना किस करतानाही दिसत आहेत.

‘हा काय ड्रामा आहे राखी, नेमकं काय चाललंय’ असा सवाल एका युजरने केला. तर ‘कधी हसतेस, कधी रडतेस.. तुझ्यासोबत नेमकं काय घडतंय तेच कळत नाही’ असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी या संपूर्ण प्रकरणाला पब्लिसिटी स्टंट म्हटलंय.

राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांनी सात महिन्यांआधीच निकाह केल्याचं त्यातून स्पष्ट झालं होतं. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये राखी आणि आदिलच्या मॅरेज सर्टिफिकेटचाही समावेश होता. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने धर्म परिवर्तन केलं. राखीने तिचं नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवलं. मात्र आदिलने हे मानण्यास साफ नकार दिला.

“आदिलने मला स्वीकारलं नाही तर हे लव्ह-जिहादच आहे. जर त्याने माझा स्वीकार केला तर हा लव्ह-मॅरेज असेल, निकाह असेल. मी साफ मनाने हा निकाह केला होता. मी अल्लाहकडे विनंती करते की आदिलने हे लग्न स्वीकारावं किंवा मग अल्लाहने माझा जीव घ्यावा. आता हा कलंक मला सहन होत नाही”, असं राखी रडत-रडत माध्यमांसमोर म्हणाली होती.