Rakhi Sawant हिचं हिजाब घालून नमाज पठण, रोजा ठेवल्यामुळे ड्रामा क्विन ट्रोल

कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी राखी सावंत आता रोजा ठेवल्यामुळे ट्रोल; आदील खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखीचा पहिला रोजा... ड्रामा क्विन व्हिडीओ पोस्ट करत म्हणली...

Rakhi Sawant हिचं हिजाब घालून नमाज पठण, रोजा ठेवल्यामुळे ड्रामा क्विन ट्रोल
| Updated on: Mar 25, 2023 | 3:04 PM

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (RaKhi Sawant) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली राखी आता हिजाब घालून नमाज पठण केल्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र राखी सावंत हिची चर्चा रंगलेली आहे. रमजानच्या पवित्र महिन्याची सुरुवात झाली आहे. रमजानच्या महिन्याचं निमित्त साधत राखीने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सांगायचं झालं तर आदील खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. शिवाय आदील याने लग्नानंतर राखीचं नाव देखील फातिमा असं ठेवलं. या गोष्टीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

लग्नानंतर पहिला रमजान असल्यामुळे राखीने रोजाचं पालन करत आहे. शिवाय ड्राम क्विनने नमाज पठण देखील केलं. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रखीने पहिला रोजा असल्याची माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र राखीने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे.

राखीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘नवरात्री आणि सोळा सोमवार यावर देखील लक्ष ठेव..’ तर अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘रोजा ठेवला आहेस, तर लिपस्टिक का लावली आहेस…’ सध्या सर्वत्र राखीच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगत आहे.

 

 

दरम्यान; लग्नानंतर राखीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर राखी हिने पती आदील खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राखी हिने पती आदिल खान (Adil Khan Durrani) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे आदिल सध्या तुरुंगात आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. (Rakhi Sawant life) काही दिवसांपूर्वी आदिल खान (Adil Khan Durrani) याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करणारी राखी हिने पतीवर गंभीर आरोप केल्यामुळे चर्चेत होती. पण आता अभिनेत्री हिजाब घालून पठण केल्यामुळे चर्चेत आली आहे.

राखी सावंत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. राखी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पडद्यापासून दूर असली तरी राखी कोट्यवधींची कमाई करत रॉयल आयुष्य जगते.