AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहताची दया बेन रिप्लेस होणार? ‘या’ अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता!

सोनी सब टिव्हीवरच्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेची देशभर आणि जगभरात चांगलीच फॅन फॉलोव्हिंग आहे.

तारक मेहताची दया बेन रिप्लेस होणार? 'या' अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता!
| Updated on: Feb 26, 2021 | 4:55 PM
Share

मुंबई : सोनी सब टिव्हीवरच्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेची देशभर आणि जगभरात चांगलीच फॅन फॉलोव्हिंग आहे. आज शोच्या प्रत्येक कलाकाराने लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये दया बेन हे पात्र तारक मेहता का उलटा चष्माच्या मालिकेतील सर्वात प्रसिध्द आहे. दिशा वकानी दया बेनचे पात्र  साकारते. 2017 पासून दिशा वकानी तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेपासून दूर गेली आहे. (Rakhi Vijan likely to appear in ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ series)

मात्र, असे असताना देखील दया बेनचे टपु के पापा, हे मां माताजी हे डायलाॅग आठवणीत आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचे प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून दया बेनच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. त्यांना आशा होती की, दया बेन मालिकेत दिसेल मात्र, आता आलेल्या बातमीनुसार दया बेनच्या पुनरागमनाची आशा मावळताना दिसत आहे. नुकताच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री राखी विजान हिने दया बेनचे पात्र साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राखी विजान म्हणाली की, मला माहिती आहे की, दिशा वकानीने दया बेनचे पात्र खूप चांगल्या प्रकारे साकारले आहे. पण मी माझ्या चाहत्यांना हासवण्यासाठी तयार आहे. परंतू आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की, जर दया बेनचे पात्र राखी विजान साकारणार आहे तर दिशा वकानीने तारक मेहता का उलटा चष्मामधून बाहेर जाणार का, यावर चर्चा रंगू लागली आहे.

इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये गोकुळधामच्या खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. ‘तारक मेहता का उलटा चश्मा‘ या प्रसिद्ध मालिकेने 3000 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिकेची टिम हे सेलिब्रेशन करण्यासाठी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये आली होती. यावेळी कलाकारांसह निर्माते असितकुमार मोदीही उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

अभिनेत्री लिसा हेडनने बेबी बंपसोबत केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं…

Video : बाॅलिवूडचा दबंग खान राखीच्याही मदतीला गेला धावून, आईने मानले आभार!

(Rakhi Vijan likely to appear in ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ series)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.