इंडियाज बेस्ट डान्सर’ शोमध्ये ‘तारक मेहता का उलटा चश्मा’च्या टिमची धमाल!

इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये गोकुळधामच्या खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. 'तारक मेहता का उलटा चश्मा' या प्रसिद्ध मालिकेने नुकताच 3000 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे.

इंडियाज बेस्ट डान्सर’ शोमध्ये ‘तारक मेहता का उलटा चश्मा’च्या टिमची धमाल!
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 5:40 PM

मुंबई : इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये गोकुळधामच्या खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. ‘तारक मेहता का उलटा चश्मा‘ या प्रसिद्ध मालिकेने नुकताच 3000 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिकेची टिम हे सेलिब्रेशन करण्यासाठी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये आली आहे. यावेळी कलाकारांसह निर्माते असितकुमार मोदीही उपस्थित होते. सर्व कलाकारांनी जज गीता कपूर, टेरेन्स लुईस आणि मलायका अरोरा यांच्यासोबत धमाल केली. (Taarak mehta ka ooltah chashmah 3000 episode celebration) जेठालाल-दयाची भेट होणार? गेल्या अनेक दिवसांपासून दया बेन मालिकेत दिसत नाहीये. जेठालाल आता दयाला भेटण्यासाठी इच्छूक आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जेठालाल दया बेनला भेटणार असल्याची चर्चा होती. मात्र, जेठालालची निराशाच होते. नृत्यदिग्दर्शक रुतुजा हिने दयाबेन बनून नृत्य सादर केले. ज्याप्रकारे तिने दयाबेन यांच्यासारखा अभिनय केला आणि गरबा खेळला. यावरून असे वाटले की, खरोखरच दया बेन तारक मेहता मालिकेत परत आली. तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गंमतीने म्हणाले देखील की, या ‘दया बेन’ ला आम्हाला द्या. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’च्या महिला मंडळाने नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस यांच्या सोबत डान्स केला. जेठालाल आणि बबिताने ‘हम तुम एक कमरे में बंद हो’ या गाण्यावर डान्स केला. अलीकडेच ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेत कलाकार बदलले जात आहेत. मालिकेत गेली 12 वर्षे ‘अंजली मेहता’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता आणि ‘रोशनसिंग सोढी’ ची भूमिका साकारणारे गुरचरण सिंह यांनी या मालिकेमधून निरोप घेतला आहे. आता रोशनसिंग सोढीची भूमिका बलविंदर सिंग करत आहे. आणि ‘अंजली भाभी’च्या भूमिका आता सुनैना फौजदार करत आहे. कलाकारांचे मानधनही चर्चेत तारक मेहताची भूमिका साकारणारे कवी शैलेश लोढा यांना प्रत्येक भागासाठी तब्बल एक लाख रुपये इतके मानधन मिळते. तसेच अय्यर भाईची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे आणि गुरुचरण सिंह सोढी यांना प्रत्येक भागासाठी 65 ते 80 हजार रुपयांपर्यंत दिले जातात. बापूजी, चंपक लाल म्हणजेच अमित भट्ट याला प्रत्येक भागासाठी 70 ते 80 हजार, आत्माराम भिडे म्हणजे मंदार चांदवडकरला 80 हजार, अब्दुल म्हणजे शरद संकला 35 ते 40 हजार, डॉक्टर हाथी म्हणजे निर्मल सैनीला 20 ते 25 हजार आणि टप्पू सेनाच्या प्रत्येक सदस्याला 20 हजार रुपये प्रति एपिसोड दिले जातात. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील सर्वात महागडा कलाकार आहे जेठालाल अर्थात दिलीप जोशी. दिलीप जोशी यांना एका एपिसोडचे तब्बल दीड लाख रुपये दिले जातात.

संबंधित बातम्या : 

Laxmii | खिलाडी कुमारला ‘बॉयकॉट’चा धसका, अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलले!

Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात सुरेश रैनाची जोरदार फटकेबाजी!

(Taarak mehta ka ooltah chashmah 3000 episode celebration)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.