Rakul Preet Singh: फक्त पॉकेटमनीसाठी केला पहिला फिल्म; आज आहे इतक्या कोटींची मालकीण

| Updated on: Oct 10, 2022 | 3:18 PM

करिअरपासून अफेअरपर्यंत.. जाणून घ्या रकुलविषयी काही खास गोष्टी

1 / 7
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जम बसवल्यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. रकुलने 2009 मध्ये 'अनिता' या कन्नड चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी रकुलने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मात्र अभिनयविश्वात येण्याचा तिचा कोणताच प्लॅन व्हता.

2 / 7
फक्त पॉकेटमनीसाठी रकुलने पहिला चित्रपट साइन केला. मात्र याच चित्रपटासाठी तिला क्रिटिकली अक्लेम अवॉर्डसुद्धा मिळाला होता. त्यावेळी तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीविषयी फारशी माहिती पण नव्हती.

3 / 7
"पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर मी बराच काळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्यानंतर 2014 मध्ये मी यारियाँ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी मी फक्त 19 वर्षांची होते", असं रकुलने एका मुलाखतीत सांगितलं.

4 / 7
'यारियाँ'नंतर रकुलने 'अय्यारी' या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. बॉलिवूडमध्ये रकुलचा पहिला हिट चित्रपट 'दे दे प्यार दे' हा ठरला. यामध्ये तिने अजय देवगणसोबत भूमिका साकारली होती.

5 / 7
रकुलच्या नावामागची गोष्टसुद्धा खूपच रंजक आहे. रकुलच्या आईवडिलांना त्यांच्या नावांना जोडून मुलीचं नावं ठेवायचं होतं. त्यामुळे वडिलांचं नाव राजेंदर आणि आईचं नाव कुलविंदर यातील शब्द मिळून रकुल हे नाव ठेवलं.

6 / 7
रकुलने फार कमी वयापासूनच यशाची चव चाखली. आज तिच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 पर्यंत रकुलची एकूण संपत्ती ही 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 45 कोटी रुपये इतकी आहे.

7 / 7
रकुल एका चित्रपटासाठी जवळपास दीड कोटी रुपये मानधन घेते. तर दर महिन्याला जाहिरातींमधून ती जवळपास 50 लाख रुपयांची कमाई करते. गेल्या काही वर्षांपासून रकुल ही निर्माता जॅकी भगनानीला डेट करतेय.