Ramayana: आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ सिनेमावर येणार गेम? दिग्दर्शकाने सांगूनच टाकलं

Ramayana: 'रामायण'च्या यशाच्या पार्श्वभूमीवर, निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी चित्रपटाबाबत एक मोठा प्लान सांगितला आहे. त्यांनी सांगितले की 'रामायण'च्या कथेवर आधारित GTA-सारखा एक व्हिडिओ गेम लवकरच प्रदर्शित होऊ शकतो.

Ramayana: आदिनाथ कोठारेच्या रामायण सिनेमावर येणार गेम? दिग्दर्शकाने सांगूनच टाकलं
Ramayana
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 29, 2026 | 2:35 PM

बॉलिवूड रणबीर कपूर, मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे, यश आणि साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ५ नोव्हेंबरला सिनेमागृहात रिलीज झाला होता आणि पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. याच दरम्यान चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

नमित मल्होत्रा यांनी सांगितलं की ‘रामायण’च्या जगावर आधारित GTA सारखा एक व्हिडीओ गेम तयार केला जात आहे. या गेमच्या माध्यमातून मुलं खेळता-खेळता या महाकाव्याची कथा जाणून घेऊ शकतील आणि त्याचा भागही बनू शकतील.

Loading...

नमित मल्होत्रा यांनी केली GTA सारख्या गेमची घोषणा

नमित मल्होत्रा यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की त्यांची टीम ‘रामायण’वर आधारित एक ॲक्शन व्हिडीओ गेम बनवत आहे. या गेमच्या माध्यमातून दर्शक चित्रपटाच्या जगाला जवळून अनुभवू शकतील. नमित यांना वाटतं की मुलांनीही गेमच्या माध्यमातून रामायणच्या कथेशी जोडावं आणि खेळताना त्याबद्दल शिकावं.

नमित मल्होत्रा काय म्हणाले?

गेमविषयी बोलताना नमित म्हणाले की, “GTA सारखा एक गेमही येत आहे, पण मी योग्य वेळी त्याबद्दल अधिक सांगेन. हा गेम रामायणवर असेल. मला वाटतं की प्रत्येक मूल रामायण अगदी तसंच खेळावं, जसं ते GTA खेळतात. मला वाटतं की गेम खेळताना त्यांना मजाही यावी आणि शिकायलाही मिळावं.”

गेममध्ये जटायूसोबत उडू शकतील मुलं

नमित मल्होत्रा यांनी पुढे सांगितलं की त्यांचा उद्देश दर्शकांना चित्रपटाच्या जगाशी जोडणं हा आहे. त्यांना वाटतं की लोक चित्रपट पाहिल्यानंतरही रामायणच्या या जगाचा भाग बनू शकतील. ते म्हणाले, “माझा प्लॅन होता की जेव्हा लोकांना चित्रपट पाहून या जगावर विश्वास बसेल आणि ते त्याचा आनंद घेऊ लागतील, तेव्हा ते जटायूसोबत उडू शकतील आणि रावणाशी लढू शकतील. आम्ही आमच्या गेममध्ये हेच दाखवणार आहोत. या गेमवर सध्या काम सुरू आहे. याबद्दल मी नंतर सविस्तर बोलतो.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us