
Upasana Kamineni Grandmother Passed Away : अभिनेता राम चरण (RamCharan) याची पत्नी उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) सध्या गर्भधारणेचे सुख अनुभवत आहे. याच दरम्यान उपासना कामिनेनी आणि राम चरण यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. उपासना कामिनेनी हिच्या आजीचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या पत्नीच्या आजीची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. अखेर त्यांचं निधन झालं आहे. उपासना कामिनेनी हिने आजीच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. शिवाय उपासना कामिनेनी हिने आजीसोबत एक सुंदर फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
इन्स्टाग्रामवर आजीसोबत फोटो शेअर करत उपासना कामिनेनी हिने कॅप्शनच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. ‘आजीने शेवटपर्यंत प्रेम आणि आदराने आयुष्याचा आनंद घेतला. पुष्नानीने माझा सांभाळ केला, मला वाढवलं… त्यांना मी कायम स्मरणात ठेवेल. माझ्या आजी-आजोबांसोबत माझे जे अनुभव आहेत, ते अनुभव मी माझ्या मुलांना देईल असं वचन देते.’ सध्या राम चरणच्या पत्नीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच राम चरण याच्या पत्नीने चाहत्यांना आनंदाची बातमी देत एका पार्टीचं आयोजन केलं होतं. राम आणि पत्नीच्या आनंदात कुटुंबातील अनेक जण उपस्थित होते. यावेळी कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांनी दोघांना आशीर्वाद देखील दिले.पार्टीचे फोटो देखील उपासनाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
उपासना लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर तिच्या सासरे आणि साऊथचे अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. पण आता आजीच्या निधनानंतर उपासना कोलमडली आहे. उपासनाचे तिच्या आजीसोबत अनोखं नातं होतं.