दीपिका राहिली बाजूला, रणबीर ‘या’ अभिनेत्रीसह गप्पांमध्ये रंगला… ये जवानी है दिवानी च्या रियुनिअनमध्ये दिसला अनोखा बाँड

दीपिका पदुकोणपेक्षा, रणबीर कपूर कल्की कोचलिनसोबत बराच वेळ गप्पा मारत होता. त्यांच्या दोघांमधील दुवा होता, रणबीरची लेक ..

दीपिका राहिली बाजूला, रणबीर या अभिनेत्रीसह गप्पांमध्ये रंगला... ये जवानी है दिवानी च्या रियुनिअनमध्ये दिसला अनोखा बाँड
दीपीकापेक्षा रणबीरच्या कल्कीशी रंगल्या जास्त गप्पा
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 05, 2023 | 5:22 PM

मुंबई : ये जवानी है दिवानीच्या ( YJHD) चित्रपटाला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने करण्यात आलेल्या एका सेलिब्रेशनमध्ये रणबीर (Ranbir kapoor) , दीपिकासह (Deepika Padukone) चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. दीपिका-रणबीरच्या फोटोंनी इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली. ते फोटो पाहून चाहते नॉस्टॅल्जिक झाले आणि बऱ्याच जणांनी YJHD 2 यावा अशी मागणी केली आहे. दीपिका आणि रणबीरचे संपूर्ण YJHD टीमसोबत पार्टी करतानाचे फोटो खूप मस्त होते. नुकतेच दीपिकाने हे फोटो शेअर केले होते.

मात्र या पार्टीत रणबीरने दीपिकाशी नव्हे तर दुसऱ्याच व्यक्तीशी गप्पा मारल्या. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री कल्की कोचलिन. हो, हे खरं आहे… बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या पार्टीत दीपिकापेक्षा रणबीर कल्कीशी जास्त बोलत होता. त्या दोघांमधील दुवा होता रणबीरची लेक , राहा कपूर.. ! त्या दोघांनी एकमेकांशी मुलांसबंधी बरीच चर्चा केली.

पार्टीत उपस्थित असेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, रणबीरची मुलगी राहा, ही आता 6 महिन्यांची झाली आहे आणि रणबीर तिच्याबद्दल अतिशय सेन्सिटिव्ह आहे. तर कल्की हिची लेक, सॅफो ही तीन वर्षांची आहे. त्यामुळे पार्टीत दोघंही मुलांबद्दल बोलत होते. रणबीर कल्कीकडून पॅरेंटिंगच्या अनेक टिप्स ऐकत होता. तिला बरेच प्रश्नही विचारत होता. आणि त्यांच्या सोबत या चर्चेत करण जोहरही सहभागी झाला होता, त्याला रूही आणि यश अशी दोन मोठी मुलं आहेत. त्यामुळे हे तिघेही पालकत्वाबद्दल, मुलांच्या जडणघडणीबद्दल बोलत होते, असे समजते.

तर दुसरीकडे अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर आणि दीपिका पदुकोण यांसारखे काही अविवाहित आणि काही विवाहित लोक चित्रपट निर्मिती प्रक्रियेच्या गप्पांमध्ये अधिक मग्न होते . त्यांनी बऱ्याच सर्जनशील गप्पा मारल्या. तर पालकत्वाचा नवा अनुभव घेणारा रणबीर कपूर कौटुंबिक गप्पा मारत होता. नवजात बाळांना सांभाळण्याबद्दल त्याने कल्कीकडून बरीच माहिती घेतली. हे खूपच क्युट आहे, नाही का ?

रणबीर आणि आलियाची लेक राहा आता सहा महिन्यांची झाली असून नुकतीच ती आई सोबत, आत्या करीना कपूरच्या घरीदेखील गेली होती. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तैमूर आणि जेह हे दोघे राहा, हिला पहिल्यांदाच भेटले.