रणबीर कपूरने BBC च्या कार्यालयांवरील छापेमारीवरून पत्रकाराला घेरलं; नेटकरी म्हणाले ‘वाह भाई वाह!’

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याने पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिलं. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या अनिश्चित काळाविषयी प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला त्याने असा प्रतिप्रश्न केला, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार होतेय.

रणबीर कपूरने BBC च्या कार्यालयांवरील छापेमारीवरून पत्रकाराला घेरलं; नेटकरी म्हणाले वाह भाई वाह!
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2023 | 8:22 AM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘तू झूठी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याने पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिलं. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या अनिश्चित काळाविषयी प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला त्याने असा प्रतिप्रश्न केला, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार होतेय. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

रणबीरचा प्रतिप्रश्न

या व्हिडीओमध्ये एक पत्रकार रणबीरला विचारते, “रणबीर, बॉलिवूडचं आता सध्या तळ्यातमळ्यात दिसतंय.” ती महिला पत्रकार तिचा प्रश्न पूर्ण करण्याआधीच रणबीर तिला म्हणतो, “काय बोलतेयस? तू पठाणचं कलेक्शन पाहिलं नाहीस का?” यानंतर संबंधित पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रणबीरने तिला विचारलं, “आधी मला हे सांगा की तुम्ही कोणत्या पब्लिकेशनचे आहात?” त्यावर ती उत्तर देते “बीबीसी न्यूज”.

बीबीसी न्यूजवरून पत्रकाराला घेरलं

पब्लिकेशनचं नाव ऐकल्यानंतर रणबीर तिलाच प्रतिप्रश्न विचारतो. “बीबीसी न्यूज. आता तर तुमच्या इथे पण काहीतरी सुरू आहे ना? त्याचं काय? त्याचं आधी उत्तर द्या.” संबंधित पत्रकार रणबीरला म्हणते, “सांगेन मी आरामात.” तेव्हा रणबीर पुन्हा म्हणतो, “मग मीसुद्धा आरामातच सांगेन.”

रणबीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. आयकर विभागाने कथित करचुकवेगिरीच्या चौकशीचा एक भाग म्हणून दिल्ली आणि मुंबईतल्या बीबीसी न्यूजच्या कार्यालयात सर्वेक्षण केलं होतं. तेव्हा त्याची जोरदार चर्चा होती. रणबीरने याच मुद्द्यावरून पत्रकाराला घेरलं.

रणबीरचा ‘तू झूठी मै मक्कार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव रंजनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या दिग्दर्शकाने ‘सोनू के टिटू की स्विटी’ या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘तू झूठी मै मक्कार’ या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर, अनुभव सिंह बस्सी आणि राजेश जैस यांच्याही भूमिका आहेत. येत्या 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.