AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh : लालबागच्या राजाच्या चरणी रणवीर नतमस्तक, 1 हजार मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

अभिनेता रणवीर सिंगने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गणेश चतुर्थीला त्याने 1000 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची मोठी घोषणा केली. या पुढाकारातून त्याने 'सेवा संकल्प अभियान'ला पाठिंबा दिला.

Ranveer Singh : लालबागच्या राजाच्या चरणी रणवीर नतमस्तक, 1 हजार मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च
Image Credit source: social media
| Updated on: Sep 18, 2026 | 4:30 PM
Share

अभिनेता रणवीर सिंगसाठी हे वर्ष खरोखरच खूप खास ठरलं आहे. ‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद, मोठं यश यापासून ते पत्नी दीपिका पदुकोणच्या दुसऱ्या गरोदरपणापर्यंत, त्याच्या आयुष्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत. या सर्वच गोष्टींबद्दल आभार मानण्यासाठी रणवीर हाँ नुकताच गणरायाच्या चरणी लीन झाला. मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम असून या दरम्यान रणवीरने विख्यात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलं. एवढंच नव्हे तर तिथे त्याने मोठी घोषणाही केली. रणवीर सिंगने 1 हजार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प केला.

यशाबद्दल बाप्पाचे आभार

अभिनेता रणवीर सिंग हा’लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी आला होता, तिथे त्याने मनोभावे प्रार्थना करून आशीर्वाद घेतले. बाप्पाच्या दर्शनानंतर आणि प्रार्थना केल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. ” इथे येऊन खूप छान वाटतंय. बाप्पाच्या कृपेने, गेल्या वर्षभरात माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात खूप आनंद आला. त्यामुळेच, त्यांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि पुढील प्रवासासाठी—म्हणजेच आयुष्याच्या प्रवासासाठी—त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो आहे” असं रणवीरने नमूद केलं.

1000 मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

गणेशोत्सवादरम्यान रणवीर सिंगने आणखी पुढाकार घेऊन एका उत्तम कार्याची सुरूवात करणार असल्याची घोषणा केली. ” गणेश चतुर्थी आणि आपले आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी, ‘सेवा संकल्प अभियाना’त सहभागी होऊन 1 हजार मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्याचा मी संकल्प करत आहे. यामुळे बाप्पा प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील,” अशी आशाही रणवीरने यावेळी व्यक्त केली,

धुरंधरच्या यशानंतर पहिल्यांदाच मीडियाशी बातचीत

दरम्यान, लालबागला आलेल्या रणवीरची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. रणवीरने सर्वांशी संवाद साधला आणि चाहत्यांसोबत फोटोही काढले. ‘धुरंधर’च्या प्रचंड यशानंतर आणि ‘डॉन ३’ बद्दल वाद निर्माण झाल्यानंतर, रणवीरने प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची आणि चाहत्यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.

या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यावेळी रणवीर तिथे एकटाच उपस्थित होता. याआधी, सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याने अंबानींच्या घरी गणपती महोत्सवालाही हजेरी लावली होती.

अलीकडेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतचे सुंदर फोटो शेअर केले. यात अभिनेत्रीने आपला ‘बेबी बंप’ फ्लाँट केलं होतं.  2024 साली त्यांच्या लेकीचा, ‘दुआ’चाजन्म झाला, आता ते लवकरच दुसऱ्यांदा पालक होणार आहेत.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं