रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? व्हायरल फोटोवर कमेंट्सचा पाऊस

रश्मिका-विजयच्या लग्नाचा फोटो पाहून चाहते अवाक्; म्हणाले "हे कधी झालं?"

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? व्हायरल फोटोवर कमेंट्सचा पाऊस
रश्मिका-विजयच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 22, 2022 | 1:49 PM

मुंबई: टॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदम या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर ही जोडी लोकप्रिय झाली. मात्र खऱ्या आयुष्यातही या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच शिजतंय, अशी शंका चाहत्यांना आहे. आता तर सोशल मीडियावर थेट त्यांच्या लग्नाचाच फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.

विजय आणि रश्मिकाने गुपचूप लग्न केलं की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दोघांनी नेहमीच विविध मुलाखतींमध्ये अफेअरच्या चर्चांवर नकारात्मक उत्तर दिलं. आम्ही दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत, असंच दोघांनी म्हटलंय. पण या दोघांनी एकत्र यावं, अशी कुठे ना कुठे तरी चाहत्यांचीही इच्छा आहे.

रश्मिका आणि विजयची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ऑफस्क्रीनसुद्धा पहायला मिळावी, अशी अनेकांची इच्छा आहे. म्हणूनच या दोघांच्या लग्नाचा फोटो मॉर्फ करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

‘हे फोटो सत्यात उतरावं’ असं एकाने म्हटलंय. तर ‘एडिटिंगसुद्धा खऱ्या आयुष्यात सत्यात बदलावी’ अशी इच्छा चाहत्याने बोलून दाखवली. रश्मिका आणि विजय या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करिअरची सुरुवात केली असली तरी बॉलिवूडमध्ये त्यांचा फॅन फॉलोईंग मोठा आहे.

विजयने नुकतंच ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर रश्मिकानेसुद्धा याचवर्षी ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मात्र या दोघांचे चित्रपट फ्लॉप ठरले. काही दिवसांपूर्वी रश्मिका आणि विजय एकत्र मालदीवला फिरायला गेले होते, अशीही चर्चा होती. मुंबई एअरपोर्टवर दोघांना पाहिलं गेलं होतं. रश्मिकाच्या पाठोपाठ थोड्या वेळानंतर विजय मुंबई एअरपोर्टवर पोहोचला होता.