Raveena Tandon: मुलीच्या निरोप समारंभात रवीना टंडन भावूक; म्हणाली ‘घरट्यातून उडण्यासाठी तयार..’

या पोस्टमध्ये रवीनाने करण जोहर आणि त्याच्या मुलांसाठीही लिहिलं आहे. 'करण जोहरला पालकाच्या रुपात पाहणं खूप मजेशीर होतं. शाळेचा नवीन पालक, एँजॉय करण', असं तिने म्हटलंय.

Raveena Tandon: मुलीच्या निरोप समारंभात रवीना टंडन भावूक; म्हणाली घरट्यातून उडण्यासाठी तयार..
Raveena Tandon: मुलीला निरोप देताना रवीना टंडन भावूक
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2023 | 11:22 AM

मुंबई: अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या मुलीसोबतचा अत्यंत अभिमानास्पद आणि तितकाच भावूक करणारा क्षण शेअर केला आहे. रवीनाची मुलगी राशा हिने नुकतंच तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. राशा ही धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. शाळेच्या शेवटच्या दिवशी काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत रवीनाने ही भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये रवीनाने तिच्या लाडक्या मुलीसाठी बरंच काही लिहिलं आहे. त्याचसोबत निर्माता-दिग्दर्शक करण जोहरलाही पालक झाल्याचं पाहून तिने आनंद व्यक्त केला.

रवीनाने मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘वर्ष 2023 च्या क्लासला निरोप देत आहोत.. प्रत्येक आई-वडिलांसाठी आपल्या मुलांना मोठं होतं पाहणं खूप भावनिक क्षण असतात. मुलं आता घरट्याबाहेर पडण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. किती लवकर ते मोठे झाले आहेत. तुमच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही कामना करतो.’

या पोस्टमध्ये रवीनाने करण जोहर आणि त्याच्या मुलांसाठीही लिहिलं आहे. ‘करण जोहरला पालकाच्या रुपात पाहणं खूप मजेशीर होतं. शाळेचा नवीन पालक, एँजॉय करण’, असं तिने म्हटलंय. यासोबतच तिने करणसोबतचेही फोटो पोस्ट केले आहेत. राशाच्या स्कूल कॅम्पसच्या आतील एक व्हिडीओसुद्धा तिने पोस्ट केला आहे.

रवीना टंडन आणि अनिल थडानी यांनी 2004 मध्ये लग्न केलं. या दोघांना राशा ही मुलगी आणि रणबीर हा मुलगा आहे. याशिवाय रवीनाने पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. या दोघींची लग्न झाली आहेत. रवीना आता आजीसुद्धा बनली आहे. या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.