‘टिप-टिप बरसा पानी’चं शूटिंग करताना रवीना होती नर्व्हस, या व्यक्तीची वाटत होती भीती

| Updated on: May 31, 2023 | 3:23 PM

रवीना टंडनच्या सर्वाधिक हिट गाण्यांच्या यादीत 'टिप-टिप बरसा पानी' हे टॉपवर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, हे गाणं शूट करण्याआधी रवीनाला एका व्यक्तीची भीती वाटत होती.

‘टिप-टिप बरसा पानी’चं शूटिंग करताना रवीना होती नर्व्हस, या व्यक्तीची वाटत होती भीती
रवीना-अक्षयचे हे गाणं ऑल टाईम हिट आहे
Image Credit source: social media
Follow us on

Raveena Tandon Tip Tip Song : रवीना टंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या आयकॉनिक गाण्याला (tip tip barsa paani) जवळपास 29 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही हे गाणे बॉलिवूडच्या ऑल टाईम हिट रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे. या गाण्यातील रवीना टंडन आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री इतकी अप्रतिम आहे की आजही अनेक लोकांचं हे आवडतं गाणं आहे. पण हे गाणं इतकं सहज तयार झालं नाही. यामध्ये अनेक बदल करण्यात आले होते, त्यानंतर रवीनाने गाण्याला होकार दिला होता.

एका मुलाखतीत रवीना टंडनने या गाण्याशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत. खरं तर, अलीकडेच मोहरा चित्रपटाचे निर्माते आणि लेखक शब्बीर बॉक्सवाला यांनी सांगितले होते की, या गाण्याच्या शूटिंगपूर्वी रवीना टंडन नर्व्हस होती. याबाबत रवीनाला विचारणा केली असता ती याबद्दल मोकळेपणाने बोलली

रवीनाने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिला या गाण्याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तिला वाटले की हे खूप सेन्श्युअस गाणे असेल, पण ते ज्या पद्धतीने शूट केले गेले ते पाहून तिला खूप आनंद झाला. रवीनाला विचारण्यात आले की ‘टिप-टिप बरसा’ आणि ‘जुबान पे जो नहीं आये’ या गाण्यांनी तिची सेन्श्युअस शैली दाखवली. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, ‘मला वाटतं सेक्शुॲलिटी आणि सेन्श्युॲलिटी यात अगदी थोडंसं अंतर आहे.’

सेक्सी दिसण्यासाठी कमी कपडे घालणे आवश्यक आहे असं नव्हे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आणि चेहऱ्यानेही सेक्सी दिसू शकता, असं रवीना म्हणाली. टिप-टिप बरसा पानी या गाण्याबाबतही असेच झाले. माझी साडी काढण्यात येऊ नये, असं मी शूटिंगपूर्वीच स्पष्ट केलं होतं. कुठलाही किसिंग सीन नसावा, असंही मी नमूद केले होतं. हे गाणं शूट करायला जाण्यापूर्वी मी माझ्या बाजूने कितीतरी अटी घातल्या होत्या. पण जेव्हा हे गाणं चित्रित झालं, ते पाहून मला कळलं की यापेक्षा परफेक्ट बॅलन्स असूच शकत नाही.

या व्यक्तीची वाटत होती भीती

याआधी एका मुलाखतीत चित्रपटाचे निर्माते शब्बीर बॉक्सवाला म्हणाले होते की रवीनाला माहित होते की हा एक चांगला चित्रपट आहे. परंतु ती टिप-टिप बरसा पानी गाणं शूट करायला खूप घाबरत होती. ती म्हणाली की, तिच्या वडिलांना हे (गाणं) आवडणार नाही. रवीनाचं हे बोलणं ऐकून चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय गमतीने म्हणाले की , मग हा चित्रपट तुझ्या वडिलांना दाखवू नकोस आणि तसंच घडलं. हा चित्रपट आणि गाणं शूट करणण्यासाठी रवीना तयार झाली.