रेखा 12 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या; चित्रपटात अभिनेत्यासोबत दिले होते बोल्ड आणि रोमँटिक सीन्स

रेखा एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या एका बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या. तसेच त्यांनी या चित्रपटात अभिनेत्यासोबत अनेक बोल्ड अन् रोमॅंटीक सीन्सही दिले होते. कोण होता तो अभिनेता माहितीये?

रेखा 12 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या; चित्रपटात अभिनेत्यासोबत दिले होते बोल्ड आणि रोमँटिक सीन्स
Rekha & Akshay Kumar Bold Scenes in Khiladiyon Ka Khiladi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2025 | 5:57 PM

बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री जिच्या सौंदर्याबद्दल कायम चर्चा होताना दिसते. ती म्हणजे रेखा. रेखा वयाच्या 70 व्या वर्षी देखील तेवढ्याचं सुंदर दिसतात. रेखा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आजही आहेत. रेखा त्यांच्या अभिनयासाठी तर चर्चेत राहिल्याच आहेत पण सोबतच अफेअर्सबद्दलही चर्चेत राहिल्या आहेत.

12 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात होत्या रेखा 

रेखा यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. अगदी त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान अभिनेत्यासोबतचही त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. असंही म्हटलं जात होतं की शुटींगदरम्यान रेखा या अभिनेत्याच्या प्रेमात होत्या. तसेच या चित्रपटात अभिनेत्यासोबत खूप बोल्ड आणि रोमँटिक सीन्स दिले आहेत.

चित्रपटात अभिनेत्यासोबत बोल्ड सीन्स 

हा चित्रपट म्हणजे ‘खिलाडियों का खिलाडी’. या चित्रपटात रेखा आणि अक्षय कुमारचे बरेच बोल्ड सीन्स आहेत जे खूप चर्चेत होते. एवढेच नाही तर रेखा आणि अक्षयच्या नात्याबद्दलच्या बातम्याही येऊ लागल्या. पण दोघांनीही ती फक्त अफवा असल्याचे म्हटले. दोघांनीही त्यावर भाष्य केले नाही.

रवीना टंडनने देखील केला होता खुलासा

असेही म्हटले जाते की रेखाच्या आधी या चित्रपटातील भूमिकेसाठी डिंपल कपाडियाला विचारणा झाली होती. पण डिंपल यांनी ती भूमिका करण्यास नकार दिला. आणि ती भूमिका रेखा यांच्याकडे गेली. पण शुटींगदरम्यान रेखा अक्षयच्या प्रेमात होत्या असं म्हटलं जातं होतं. शुटींगदरम्यान त्यांचं सेटवरचं वागणं आणि सतत त्याची काळजी घेणं तसेच सेटवर त्याच्यासाठी रेखा रोज त्यांच्या घरून जेवण बणवून आणायच्या. यावरून अफवा पसरू लागल्या होत्या. तसेच रवीना टंडनने देखील याबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

रेखा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला

दरम्यान या चित्रपटासाठी रेखा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. अक्षय कुमार आणि रेखा यांचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर दोघांनीही कधीही एकत्र काम केलं नाही.चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, खिलाडियों का खिलाडीने जगभरात 25.15 कोटी रुपये कमावले होते.