Rohini Hattangadi : त्याचा फटकळ स्वभाव…नाना पाटेकर यांच्याबद्दल रोहिणी हट्टंगडी यांचं वक्तव्य, सांगितला किस्सा

Rohini Hattangadi : रोहिणी हट्टंगडी यांनी नाना पाटेकर यांची आठवण सांगितली आहे.

Rohini Hattangadi : त्याचा फटकळ स्वभाव...नाना पाटेकर यांच्याबद्दल रोहिणी हट्टंगडी यांचं वक्तव्य, सांगितला किस्सा
| Updated on: Oct 15, 2026 | 4:06 PM

नाना पाटेकर यांचं गोव्यात 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. अनेक कलाकारांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली असून त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. काल मुंबईत नाना पाटेकर यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आलेली. यादरम्यान, रोहिणी हट्टंगडी यांनी नानांची आठवण सांगितली असून त्यांचा किस्सा सांगितला आहे. रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या की, ‘नानाचा जो फटकळ स्वभाव आहे, तो अगदी पहिल्यापासूनच आहे आणि शेवटपर्यंत तो तसाच राहिला. जो आपल्याला माहित आहे, पण त्यावेळी त्याचा खूप राग यायचा की, हा असं कसं बोलू शकतो.’

काय म्हणाल्या रोहिणी हट्टंगडी?

Loading...

‘एकदा आमच्या काकडे काकांना तो काहीतरी बोलला होता आणि तेव्हा त्याचा खूप राग आला होता, पण काकडे काकांनी त्याचं काही जास्त मनावर घेतलं नाही आणि त्यानेसुद्धा त्यानंतर फार काही दाखवलं नाही. त्याच्यानंतर सगळं ठीक झालं त्यामुळे त्यावेळचा नाना आणि आताचा नाना यामध्ये फार काही फरक नव्हता आणि असे लोक फार दुर्मिळ असतात. स्टारडम मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. नाना तो नानाच आणि जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मी मुंबईत नव्हते आधी तर माझा विश्वासच बसला नाही की हे कसं काय होऊ शकतं. कारण, अजिबात व्यसन नसलेला माणूस आणि इतका फिट माणूस अचानक असं व्हावं पण मी जास्त काही बोलू शकणार नाही .पण नाना हा नानाच तसा नाना होणं नाही. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.’ असं रोहिणी हट्टंगडी यांनी शेवटी सांगितलं.

दरम्यान, याच शोकसभेदरम्यान शिवाजी साटम म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण होण्यामागे नानांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच आपल्याला हिंदी चित्रपटांकडे वळवलं. त्यामुळे नाना हे केवळ सहकलाकार नव्हते, तर आपल्या कारकिर्दीला दिशा देणारे मित्र होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us