राजघराण्याची लेक, जिने प्रेमासाठी ओलांडली धर्माची मर्यादा, 7 वर्ष मोठ्या मुस्लिम क्रिकेटरसोबत अभिनेत्रीचं लग्न, आता जगयेत असं आयुष्य
राजघराण्याची लेक जिने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आणि प्रेमासाठी सर्व धर्माच्या मर्यादा ओलांडल्या, अभिनेत्रीने स्वतःपेक्षा मोठ्या मुस्लिम क्रिकेटरसोबत लग्न केलं... तर जाणून घ्या ती अभिनेत्री आणि राजघराण्याची लेक कोण आहे.

एक फिल्मी लाईन आहे ‘प्यार किया तो डरना क्या..’, प्रेमावर कोणाचं नियंत्रण नसतं. प्रेम एक अशी भावना आहे, ज्याबद्दल काहीही सांगता येत आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडचं हे कनेक्शन तर फार जुनं आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मंसूर अली खान पतौडी यांच्या लव्हस्टोरी सर्वांना माहिती आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी आणि अजहरुद्दीन यांची लव्हस्टोरी देखील चर्चेत राहिली. तर असे अनेक क्रिकेटर आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर, सिनेमा आणि क्रिकेट जगतातील आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांबद्दल बोलायचं झालं, तर ओठांवर सगळ्यात पहिले नाव अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे येते.
पण आज आपण ‘विरुष्का’बद्दल बोलत नाही आहोत. या दोन्ही जगतातील आणखी एक लोकप्रिय जोडी आहे, ज्यांची लोकप्रियता विराट आणि अनुष्काएवढीच आहे. सध्या ज्या कपलची चर्चा रंगली आहे, ते कपल दुसरं तिसरं कोणी नाही तर, अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान आहे. शाही घरातून संबंध असणाऱ्या सागरिका घाटगे हिने 2017 मध्ये मुस्लिम क्रिकेटपटू झहीर खानसोबत लग्न केलं. सागरिका कोल्हापूरच्या शाहू कुटुंबातील आहे. झहीर खान वयाने सागरिकापेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे.
सागरिका आणि झहीर यांची लव्हस्टोरी फार खास आहे. सागरिका हिने सांगितलं होतं की, ‘धर्माबाबत आपल्या आजू-बाजूचे लोकं अधिक चर्चा करतात, पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो… माझे आई – वडील पुढारलेल्या विचाराचे आहे…’, सागरिकाने सांगितल्यानुसार, झहीर खानने आयपीएल सामन्यांदरम्यान आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा झहीर खानने पहिल्यांदा माझ्या वडिलांची भेट घेतली, तेव्हा दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली. खरं सांगायचं तर, माझ्या आईला माझ्यापेक्षा झहीर जास्त आवडतो.’
सागरिका घाटके हिचे सिनेमे…
वर्ष 2007 मध्ये बॉलिवूडमधील ‘चक दे इंडिया’ सिनेमातून पदार्पण करणाऱ्या सागरिकाने पहिल्याच सिनेमात शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं. सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. ‘चक दे इंडिया’ सिनेमानंतर अभिनेत्रीने ‘फॉक्स’, ‘रश’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. दरम्यान, 2017 मध्ये तिने भारतीय क्रिकेटपटू झहीर खानशी लग्न केलं. आता सागरिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते .