Kon Honaar Crorepati: हॉटसीटवर बसणार सई ताम्हणकर; अभिनय कारकिर्दीचा प्रवास, सांगलीवरचं प्रेम यांविषयी मारणार मनमोकळ्या गप्पा

| Updated on: Aug 04, 2022 | 8:28 AM

सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिने या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात उलगडण्यात आले.

Kon Honaar Crorepati: हॉटसीटवर बसणार सई ताम्हणकर; अभिनय कारकिर्दीचा प्रवास, सांगलीवरचं प्रेम यांविषयी मारणार मनमोकळ्या गप्पा
'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग शनिवारी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.
Image Credit source: Tv9
Follow us on

‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी नागपूर (Nagpur) इथल्या ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते.

आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर इथल्या वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. 1992 मध्ये ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर ‘प्रोजेक्ट बाला’ या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात.

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो

मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा सुरुवातीपासूनचा प्रवास ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात उलगडला. ‘आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात’, असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केले. वयाच्या 17 व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केली. सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिने या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडण्यात आले. ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग शनिवारी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.