
मागच्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला होता. या घटनेने सगळ्या मुंबईत एकच खळबळ उडाली होती. चित्रपटात विलन सोबत लढणाऱ्या सैफ अली खानला खऱ्या आयुष्यात चोराशी दोन हात करावे लागले. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला वांद्रयाच्या लिलावतील रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर पाच ते सहा तास दोन शस्त्रक्रिया चालल्या. यावरुन सैफ अली खानवर झालेला हल्ला किती मोठा होता, ते लक्षात येतं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन सैफच्या पाठितून धारदार शस्त्राचे तुकडे काढले. सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्यासंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सैफ अली खान वांद्रयाच्या सतगुरु शरण इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतो. सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी जिने उतरुन खाली गेल्याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं होतं. पण आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार हल्ला केल्यानंतर आरोपी तब्बल दोन तास सैफच्या इमारतीतच गार्डनमध्ये लपून बसला होता. ही खूप धक्कादायक बाब आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच नाव शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहील्ला अमीन फकीर असं त्याचं नाव आहे. भारतात तो विजय दास हे नाव धारण करु राहत होता. रविवारी आरोपीला अटक करण्यात आली. कोलकात्ताचा निवासी असल्याच सांगून त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी फकीरच्या भावाकडून स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मिळवलं. त्यावरुन तो बांग्लादेशी नागरिक असल्याच सिद्ध झालं. सर्टिफिकेटवरुन तो बांग्लादेश नागरिक असल्याच सिद्ध होतं.
कधी अटक झाली?
“16 जानेवारीला सैफवर हल्ला केल्यानंतर फकीर दोन तास सैफच्याच इमारतीत गार्डनमध्ये लपून बसला होता. आपण पकडले जाऊ या भितीपोटी तो तिथे लपला होता” असं तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितलं. गुन्हा केल्यानंतर तीन दिवसांनी रविवारी मध्यरात्री त्याला अटक झाली. आरोपीने सैफच्या स्टाफकडे 1 कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. पण या दरम्यान त्याची सैफशी झटापट झाली. त्याला फ्लॅटच्या एका रुममध्ये बंद करण्यात आलं होतं. पण या रुमला खिडकी होती. त्यातून तो बाहेर पडला.