
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. मग त्याचा राग असेल, त्याचे अफेअर्स असतील किंवा त्याच्या काही सवयी. अशीच एक सवय जी बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत होती. त्याबद्दल अनेक तक्रारी देखील येत असतं. ती सवय म्हणजे त्याची दारूची सवय. सलमान खानला दारूचे व्यसन लागले होते. तो दारूच्या खूपच आहारी गेला होता. तेव्हा त्याने हे व्यसन सोडण्यासाठी एक अद्भुत मार्गाचा अवलंब केला होता. सलमानने एका मुलाखतीत याबद्दल स्वत:च खुलासा केला होता.
एक काळ असा होता जेव्हा सलमान खूप दारू प्यायचा
सलमान खानच्या कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा तो खूप दारू पिऊ लागला होता, परंतु कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्याऐवजी, सलमान खानने स्वत:वर नियंत्रण मिळवून ते व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याच्या आरोग्याला होणारे नुकसान लक्षात घेऊन, सलमान खानने त्याच्या इच्छाशक्तीने दारूवर इतके नियंत्रण मिळवले की नंतर त्याला दारू पिण्याची इच्छाच राहिली नाही.
अशाप्रकारे त्याने दारूच्या व्यसनावर नियंत्रण मिळवलं
जेव्हा जेव्हा सलमान खानला दारू प्यायची इच्छा व्हायची तेव्हा तो एका ग्लासमध्ये दारू ओतून त्याच्या समोर टेबलावर ठेवायचा. तो ग्लासमध्ये दारू त्याच्या समोर ठेवायचा पण एकही घोट घेत नसायचा. IMDb नुसार, सलमान खान तो ग्लास त्याच्या समोर ठेवायचा जोपर्यंत त्याला दारू पिण्याची इच्छा होत नव्हती.अशापद्धतीने त्याने त्याच्या या दारूच्या व्यसनावर नियंत्रण मिळवल्याचं त्याने सांगितलं.
सलमान खानच्या कामाबद्दल
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने असे 13 चित्रपट दिले ज्या चित्रपटांनी 100 कोटींचा गल्ला जमवला. सलमान खानचा शेवटचा चित्रपट ‘सिकंदर’ होता जो बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही.
सलमान खानचे आगामी चित्रपट
नुकताच सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या नवीन चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि तो या चित्रपटाचा निर्माताही असेल. सलमान खानच्या या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालं आहे. आता चित्रपटाचा टीझर व्हिडिओ कधी रिलीज होतो हे पाहायचे आहे. याशिवाय सलमान खानचा ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हा चित्रपटही बऱ्याच काळापासून चर्चेत आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसू शकतात.