AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा 28 जानेवारीचा दाैरा कोणी ठरवला? मोठी अपडेट, सीआयडीकडून…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक मोठी संशय व्यक्त केली जात आहेत.

अजित पवार यांचा 28 जानेवारीचा दाैरा कोणी ठरवला? मोठी अपडेट, सीआयडीकडून...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 07, 2026 | 11:04 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही कोणालाच विश्वास बसत नाही की, अजित पवार आपल्यात नाहीत. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चार सभांचे आयोजन करण्यात आले होते, याच सभांना पोहोचण्यासाठी अजित पवार 8.10 ला मुंबईहून निघाले आणि बारामती विमानतळाच्या अगदी जवळ भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही व्हिडीओही पुढे आली. काही सेकंदात विमान जमिनीवर कोसळले आणि मोठा स्फोट झाला. मात्र, विमान जमिनीवर कोसळल्यानंतर फक्त एकच स्फोट नाही तर चार ते पाच दुसरेही मोठे स्फोट झाले, ज्याने खळबळ उडाली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेकांनी संशयही व्यक्त केला. सध्या या विमान अपघाताची सीआयडीकडून चाैकशी केली जात आहे. दररोज राज्यातील मोठे नेते विविध संशय या विमान अपघाताबद्दल व्यक्त करत आहेत.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, याबाबत पवार कुटुंबियांसोबत कोणतीही चर्चा न करता त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चाैकशीला वेग आल्याचे बघायला मिळत आहे. 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय घडले, याचा तपास सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात 4 तास सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशी केली. सीआयडीच्या तपास 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय घडले, या दिशेने आहे. हेच नाही तर 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या दाैऱ्याचे नक्की नियोजन कोणी केले, याबाबतचे काही प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणांनी जब्त केला.

त्याची बारकाईने तपासणी केली जात आहे. त्यामधून अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात. अजित पवार यांनी 27 तारखेला त्यांच्या प्रवासाबद्दल कोणाकोणासोबत चर्चा केली, याबाबतही माहिती घेतली जात आहे. हेच नाही तर अजित पवार यांच्या प्रवासासंदर्भात काही बदल झाले का? याचीही सखोल चाैकशी केली जात आहे. हेच नाही तर 28 जानेवारीचा दाैरा कोणाच्या सांगण्यावरून ठरवण्यात आला, याबाबत तपास केला जात आहे. विमानाची निवड नक्की कोणी केली, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा तपास यादरम्यान केला जात आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश