
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. आजही त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीच जास्त चर्चा होताना दिसते.तसेच त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्यांपैकी एश्वर्यासोडून बाकी सगळ्यासोबत त्याचे आताही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यातील एक अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिना कैफ सलमान खानच्या खूप जवळची आहे. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री देखील छान आहे.
कतरिना कैफला विचारला होता सलमानबाबत हा प्रश्न
कतरिना कैफ सलमान खानच्या अनेक सवयी चांगल्या प्रकारे समजते. म्हणूनच तिला अनेकदा सलमान खानशी संबंधित प्रश्न विचारले जातात. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही असेच काहीसे घडले. ज्याच्या एका एपिसोडमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ पाहुणे म्हणून आले होते. कपिल शर्माने कतरिनाला सलमान खानची आवडती अभिनेत्री कोण हा प्रश्न विचारला होता. तेव्हा सलमानने दिलेलं उत्तर जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.
सलमानने स्वत:च सांगिलं होतं त्या अभिनेत्रीचं नाव
कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या या भागात कतरिना कैफला विचारण्यात आले की सलमान खानची आवडती अभिनेत्री कोण आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना कतरिना कैफ बराच वेळ विचार करत होती. जेव्हा तिने कोणतेही नाव सांगितले नाही तेव्हा सलमान खानने स्वतः उत्तर दिले की त्याची आवडती अभिनेत्री कतरिना कैफ आहे. मग सलमान खान म्हणाला की समोर असलेल्याचे नाव घेतले पाहिजे. तथापि, कतरिना कैफ म्हणाली की हे उत्तर चुकीचे आहे आणि सलमान खानची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. हे ऐकून सलमान खान सुरुवातीलाच स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक मजेदार प्रतिक्रिया दिसली. यानंतर सलमान खानने सांगितले की त्याची आवडती अभिनेत्री श्रीदेवी आहे.कतरिना कैफचा हा व्हिडिओ द ग्रेट इंडियन शोने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. ज्यावर वापरकर्ते हसणारे इमोजी बनवून प्रतिक्रिया देत आहेत.
Salman Khan biggest crush on Sridevi
‘ती नसती तर इंडस्ट्रीचं काय झालं असतं?’
सलमानम खानने अनेक मुलाखतींमध्ये हे सांगितलं आहे. तसेच एका अवॉर्ड शोमध्ये श्रीदेवींसमोरही त्याने हे बोलून दाखवलं होतं. तो म्हणाला होता.” ‘कधीकधी ती चित्रपटात एक मूल असते, नंतर ती त्याच चित्रपटात मोठी होते. ती जुळी बहीण, आई, मुलगी देखील बनते. ती चार्ली चॅप्लिन बनते. ती गातेही. कल्पना करा, जर तिने चित्रपटांमध्ये काम करायचं ठरवलं नसतं तर इंडस्ट्रीचं काय झालं असतं. आपल्यासारख्या चाहत्यांचं काय झालं असतं. मला वाटत नाही की यांच्यासारखी कोणीही दिग्गज कलाकार आपल्या चित्रपट इंडस्ट्रीत येईल. ते नाव श्रीदेवी आहे.’ यानंतर श्रीदेवी यांनी सलमान खानला इतका आदर आणि प्रेम दिल्याबद्दल त्याचे आभारही मानले होते.