Salman Khan : ‘कबरीमध्ये दफन होईल पण..’, वयाच्या 60 व्या वर्षी सलमान खानचं मोठं वक्तव्य, चर्चांणा उधाण
Salman Khan : अभिनेता सलमान खान वयाच्या 60 व्या वर्षी देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. पण अभिनेत्याने नुकताच केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे... जाणून घ्या भाईजान असं म्हणाला तरी काय?

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील समलान त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान नुकताच दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण 9′ शोमध्ये दिसला. सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूर देखील उपस्थित होती. यावेळी दोघांनी करण याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण सलमान खान याच्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.’माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल…’, असं वक्तव्य सलमान खान याने केलं.. जाणून घ्या भाईजान असं का म्हणाला.
करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करिश्मा, सलमान खानला विचारते, ‘जर तुझ्यावर बायोपिक तयार होत असेल तर, सूरज बडजात्या, कबीर खान, संजय लीला भन्साली आणि डेव्हिड धवन यापैकी कोणी तो बनवावा?’, यावर सलमान खानने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.
सलमान खान म्हणतो, ‘माझा बायोपिक कोणत्या अंदाजात दाखवण्यात यावर आधारित आहे. जर विनोदी भाग दाखवणार असतील तर, डेव्हिड धवन, भावूक आणि लव्हस्टोरी दाखवणार असतील तर, संजय लिळा भंन्साळी आणि सुंदर लव्हस्टोरी दाखवायच्या असतील तर सूरज बडजात्या… ऍक्शन सिनेमा असेल तर कबीर खान…’, असं सलमान म्हणाला.
पण पुढे सलमान खान असं देखील म्हणाला की, ‘पण माझ्या आयुष्यावर बोयपिक कधी तयार होणारच नाही. कारण माझं आयुष्य माझ्यासोबत कबरीमध्ये दफन होईल…’, सलमान खान याच्या अशा वक्तव्यामुळे चाहते देखील चकित झाले आहेत.
सलमान खान याला व्हयचंय बाबा
करणच्या ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये सलमान खान याने वडील होण्याची देखील इच्छा व्यक्त केली. करण जोहर याने सलमान खानला विचारलं, ‘ज्या व्यक्तीला आपल्या भावंडांच्या मुलांसोबत वेळ घालवायला आवडतं, त्या व्यक्तीला स्वतःचं मूल नसल्याची उणीव कधी जाणवते का?’असं करणने सलमानला विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानने होकार दिला आणि आपल्यालाही मूल हवं असल्याचं स्पष्ट केलं.
