अरबाजच्या मृत्यूचे लोकांना दु:ख झाले नसते, अखेर सलमान खानच्या वडिलांनी असे…

Salman Khan and Arbaaz Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मोठ्या संपत्तीचा मालकही सलमान खान आहे. सलमान खान याचे दोन्ही भाऊ सोहेल खान, अरबाज खान यांनीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अरबाजच्या मृत्यूचे लोकांना दु:ख झाले नसते, अखेर सलमान खानच्या वडिलांनी असे...
Salman Khan and Salim Khan
| Updated on: Jul 21, 2024 | 11:45 AM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. विशेष म्हणजे सलमान खानचे जवळपास सर्वच चित्रपट धमाका करतात. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सलमान खानच्या या चित्रपटाने मोठा धमाका केला. 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याची धमकी दिली जातंय. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय.

सलीम खान यांनी आपल्या तीन मुलांसमोर म्हटले होते की, सलमान खानऐवजी अरबाज खान मेला असता तर लोकांना कमी पश्चाताप झाला असता. हेच नाहीतर सलीम खान यांचे हे बोलणे ऐकून अरबाज खान आणि सोहेल खान यांनाही मोठा धक्का बसला होता. यानंतर त्यावर पुढे मोठा खुलासा करताना सलीम खान हे दिसले. 

सलीम खान हे आपल्या तिन्ही लेकांसोबत काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहोचले होते. यावेळी सलीम खान हे म्हणाले की, जेंव्हा सलमान खान आणि अरबाज खानच्या ‘हॅलो ब्रदर’ चित्रपटाची चर्चा होती. त्यावेळी लोकप्रिय अभिनेता मेला असल्याचे जर चित्रपटात दाखवले असते तर चित्रपटाच्या स्टोरीला अधिक ताकद नक्कीच मिळाली असती.

सलीम खान हे पुढे म्हणाले की, चित्रपटाच्या अर्ध्यामध्ये सलमान खानचा मृत्यू दाखवण्यात आला आणि हेच लोकांना आवडले नाही. त्याऐवजी अरबाज खानचा मृत्यू झाला असल्याचे जर दाखवण्यात आले असते तर कदाचित लोकांना फारसा पश्चाताप झाला नसता. वडील सलीम खान यांचे हे बोलणे ऐकून सलमान खान हा जोरजोरात हसण्यास सुरूवात करतो. 

वडिलांचे बोलणे ऐकून काही वेळ अरबाज खान आणि सोहेल खान यांना चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळाले. मात्र, त्यानंतर दोघेही हसण्यास सुरूवात करतात. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.