AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : भरगर्दीतून वाट काढत निघाली सलमानची कार, ड्रायव्हरची ती चूक होताच भाईजानचा चढला पारा; थेट..

अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये तो त्याच्या ड्रायव्हरवर प्रचंड भडकल्याचं दिसून आलं. असं नेमकं काय घडलं ?

Salman Khan : भरगर्दीतून वाट काढत निघाली सलमानची कार, ड्रायव्हरची ती चूक होताच भाईजानचा चढला पारा; थेट..
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 2:26 PM
Share

मुंबईसह राज्यभरात आणि देशातही गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सामान्य जनतेप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींच्याही घरी गणपतीचे आगमन होतं. मुंबईतील विविध ठिकाणच्या प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी देखील सेलिब्रिटी पोहोतचात. अभिनेता सलमान खान (Salman Khan)  देखील असाच गणपती दर्शनासाठी एके ठिकाणी पोहोचला होता. याचदरम्यान सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो ड्रायव्हरवर भडकलेला दिसला. हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. सलमान गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राजकारणी आशीष शेलार यांच्या घरी पोहोचला होता. ही बातमी लोकांना समजताच आशीष शेलार यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली. सलमान बाहेर येताच ही गर्दी बेकाबू झाली.

नेमकं काय घडलं ?

लोक सलमानच्या कारच्या अगदी जवळ पोहोचले आणि काही चाहते तर गाडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे सलमानच्या ड्रायव्हरला समोरचा रस्ता पाहणेही कठीण झाले. त्याने गाडी पुढे नेली आणि कारचे चाक एका चाहत्याच्या पायावरून गेले. सलमानने हे पाहताच तो संतापला. त्याने ड्रायव्हरच्या हातावर मारले आणि त्याला रागाने गाडी तातडीने मागे घेण्यास सांगितलं.

आधी केलं ट्रोल पण सत्य समोर येताच…

या घटनेचा छोटासा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सलमान आपल्या ड्रायव्हरसोबत गैरवर्तन करत असल्याचे लोकांना वाटलं. मात्र, नंतर संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना संपूर्ण प्रकरण समजलं. आता सोशल मीडिया यूजर्सनी सलमानचे कौतुक केलं आहे. सलमान नेहमीच आपल्या चाहत्यांची काळजी घेतो, असं अनेकांनी म्हटलं.

सलमान खानचे आगामी चित्रपट

मातृभूमी: अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा ॲ, क्शन ड्रामा चित्रपट 2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाचे शूटिंग आणि निर्मिती पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही.

मॉन्स्टर: दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक वामशी पैदिपल्ली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सलमान खान दमदार भूमिकेत दिसणार आहे.

टायगर वर्सेस पठाण: सलमान खानच्या ‘टायगर’ आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ यांच्यातील जबरदस्त टक्कर पाहायला मिळणारा हा चित्रपटही जाहीर करण्यात आला .

Follow Us
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?