AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : इतकी इज्जत तर…, सलमान खानने सर्वांसमोर कोणाला बजावलं, प्रकरण नेमकं काय? चर्चांना उधाण

Salman Khan : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो, आता देखील भाईजान सर्वांसमोर कोणाला आणि का बजावलं? याची चर्चा सुरु आहे. स्पष्ट बोलत सलमान खान म्हणाला, 'इतकी तर इज्जत ठेवूच शकता...', जाणून घ्या अभिनेता असं का म्हणाला.

Salman Khan : इतकी इज्जत तर..., सलमान खानने सर्वांसमोर कोणाला बजावलं, प्रकरण नेमकं काय? चर्चांना उधाण
Salman Khan
| Updated on: Oct 23, 2026 | 9:37 AM
Share

Salman Khan : 22 ऑक्टोरबर रोजी मुंबईत IIFA 2027 साठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला सलमान खान, करीना कपूर, वरुण धवन, शाहिद कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. विशेषतः सलमान खानच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतले; तो एका स्टायलिश सूटमध्ये आणि गॉगल लावून आला होता. दरम्यान, यावेळी सलमानने पापाराझींना पुन्हा एकदा इशारा दिल्याचेही पाहायला मिळालं. ‘इतकी तर इज्जत ठेवूच शकता…’, असं म्हणत अभिनेत्याने पापाराझींना चांगलंच बजावलं… सलमान खान याने असं का केलं जाणून घ्या.

आयफा 2027 च्या पत्रकार परिषदेसाठी सलमान खान उपस्थित होता. दरम्यान सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेत पोहोचण्यापूर्वी सलमान खान पापाराझींना पोज देताना दिसला. यवेळी त्याने पापाराझींना चेतावनी देखील दिली… सलमान खान म्हणाला, ‘आणि ते लक्षात आहे ना तुम्हाला… इतकी इज्जत तर तुम्ही देऊच शकता…’ त्यानंतर सलमान खान तेथून जातो…

संबंधित प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 20’ च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खान याने ट्रोल्स आणि पापाराझींच्या पाठीमागून फोटो काढण्याच्या मुद्द्यावर कडक शब्दांत फटकारले होतं. तसेच, जर कोणी मागून असं करत असेल तर त्यांना कानशिलात मारावी, असा सल्ला अभिनेत्रींना दिला होता. अशा परिस्थितीत, आता सलमान खानने आयफा 2027 च्या इव्हेंटमध्ये पापाराझींना पुन्हा एकदा हा मुद्दा आठवून दिला आहे आणि त्यांना पाठीमागून फोटो काढू नका, अशी ताकीद दिली आहे.

सलमान खान याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘बिग बॉस 20’ होस्ट करत आहे. याशिवाय, तो ‘मातृभूमी’ या सिनेमात झळकणार आहे, ज्याचं आधीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ होतं. या सिनेमाला भारत सरकारची मंजुरी मिळाली आहे. या सिनेमाची कथा आधी गलवान खोऱ्यातील भारत-चीन चकमकीवर आधारित होती, परंतु सरकारच्या निर्देशानुसार यात काही बदल करण्यात आले. या सिनेमात चित्रांगदा सिंह महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सिनेमा 2026 च्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी प्रदर्शित केला जाऊ शकतो. याची अधिकृत रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ