
2015 मध्ये सलमान खानचा सुपरहिट चित्रपट बजरंगी भाईजामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत सर्वांची मनं जिंकणारी मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. तिचा 3 जून रोजी वाढदिवस होता. आता हर्षाली ऑफिशियली टीनएजर झाली आहे. हर्षालीनं तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हर्षालीनं केक कापतानाचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कारण हर्षालीनं आयुष्याची 13 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्तानं हर्षालीसाठी खास केक मागविण्यात आला. केकवर ऑफिशियल टीनएजर असं लिहिलेलं आहे.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये हर्षालीनं पिंक कलरचा ड्रेस घातला होता, यात ती खूपच क्यूट दिसत होती.

सोशल मीडियावर चाहत्यांनीही हर्षालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवशी हर्षालीनं अनेक केक कापलेत. तिच्या एका केकवर मुन्नी लिहिलं होतं.

हर्षलीला रातोरात स्टार बनवणारी ही भूमिका आहे. या भूमिकेतून हर्षाली सर्वांच्या पसंतीस उतरली. आजही बजरंगी भाईजानच्या मुन्नीला विसरणं कठीण आहे.