Samantha: अभिनेत्रीसोबत नाग चैतन्यच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर समंथाने सोडलं मौन; म्हणाली..

आता नाग चैतन्य अभिनेत्री सोभिता धुलिपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी समंथाच्या पीआर टीमकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर अखेर समंथाने मौन सोडलं आहे.

Samantha: अभिनेत्रीसोबत नाग चैतन्यच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर समंथाने सोडलं मौन; म्हणाली..
Naga Chaitanya, Samantha, Sobhita
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 21, 2022 | 12:08 PM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) पूर्व पती आणि अभिनेता नाग चैतन्य (Naga Chaitanya) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. समंथा आणि नाग चैतन्यने गेल्या वर्षी एकमेकांना घटस्फोट दिला. त्यानंतर समंथावर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप झाले. नाग चैतन्यच्या पीआर टीमनेच अशी अफवा पसरवली असेल, अशी चर्चा त्यावेळी होती. आता नाग चैतन्य अभिनेत्री सोभिता धुलिपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी समंथाच्या पीआर टीमकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर अखेर समंथाने मौन सोडलं आहे. नाग चैतन्यच्या डेटिंगच्या वृत्तावर तिने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

समंथाचं ट्विट-

‘मुलीविषयी अफवा असल्यास- त्या खऱ्या असतील
मुलाविषयी अफवा असल्यास- त्या मुलीनेच पसरवल्या असतील
थोडीतरी बुद्धिमत्ता वाढवा
जे दोघं जण यात सहभागी होते ते कधीच त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तुम्हीसुद्धा यातून पुढे गेलं पाहिजे. तुमच्या कामावर, कुटुंबीयांवर लक्ष केंद्रीत करा. आयुष्यात तुम्हीसुद्धा पुढे व्हा,’ असं ट्विट समंथाने केलंय. समंथाच्या पीआर टीमने अफवा पसरवल्याच्या वृत्ताची लिंक शेअर करत तिने हे ट्विट केलंय.

नाग चैतन्य-सोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा

नाग चैतन्यच्या हैदराबादमधील घराजवळ अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि त्याला एकत्र पाहिलं गेलं. यावेळी दोघंही एकमेकांसोबत अत्यंत कम्फर्टेबल दिसत होते आणि नाग चैतन्य तिला आपलं नवीन घर दाखवत होता, असं वृत्त ‘पिंकविला’ने दिलंय. इतकंच नव्हे तर घराची पाहणी केल्यानंतर दोघं एकाच कारमधून परत गेले. सोभिताचा ‘मेजर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती ज्या ज्या हॉटेलमध्ये थांबली, तिथे अनेकदा नाग चैतन्यला पाहिलं गेल्याचंही म्हटलं जातंय. नुकताच सोभिताने आपला वाढदिवसुसुद्धा हैदराबादमध्ये नाग चैतन्यसोबत साजरा केल्याचं कळतंय. याबद्दल अद्याप सोभिता किंवा नाग चैतन्यने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सोभिता ही तेलुगू अभिनेत्री असून तिने मल्याळम आणि हिंदी चित्रपटातही काम केलंय.