Samay Raina: चुलत भावाची तुलना थेट नवऱ्यासोबत कारण.. मौलाना प्रचंड भडकले, समय रैना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Samay Raina: लोकप्रिय कॉमेडियन समय रैना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुस्लिम समाजाबाबत केलेल्या एका कमेंटमुळे मौलाना चिडले असून त्यांनी यांवर आक्षेप घेतला आहे, जाणून घ्या समय असं म्हणाला तरी काय?

Samay Raina: चुलत भावाची तुलना थेट नवऱ्यासोबत कारण.. मौलाना प्रचंड भडकले, समय रैना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Samay Raina
| Updated on: Nov 15, 2026 | 9:01 AM

Samay Raina: प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन समय रैना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच मुस्लिम समाजाचे मौलना मौलाना खलील रहमान नूरी यांनी समय याच्यावर निशाणा साधला आहे. सांगायचं झालं तर, शुक्रवारी नेटफ्लिक्सवर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीजन 2 चा एक एपिसोड प्रदर्शित झाला. एपिसोडमध्ये सलमा दिवाणी (तिचं खरं नाव भाग्यश्री तार्के असं आहे.) नावाच्या एका स्पर्धकावर मोठी टिप्पणी केली. शोमध्ये आलेल्या सलमा हिच्यासोबत बोलताना, समय याने तिला विचारलं, तुझ्यासोबत कोण आलं आहे? यावर सलमा म्हणाली, मुंबईत मी एकटी आली आहे पण शोमध्ये चुलत (कझिन) भावासोबत आली आहे. तेव्हा पॅनलमध्ये बसलेली हुमा कुरेशी विचारते ‘कोणता कझिन?’ यावर समय म्हणतो, ‘नवरा असेल..’

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत अनेकांनी समय यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा समय यावा टीकेचा सामना करावा लागत आहे. ‘ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमा’चे सचिव मौलाना खलील रहमान नूरी यांनी देखील संताप व्यक्त केलाय, “नैतिकदृष्ट्या हे चुकीचं आहे. मला हे योग्य वाटत नाही. त्याने असं विधान करायला नको होतं. त्या कोणासोबत आल्या—किंवा कोणासोबत आल्या नाहीत—ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्या त्यांच्या पतीसोबत किंवा इतर कोणासोबत आल्या होत्या, असा दावा करणं पूर्णपणं अयोग्य आहे. हे चुकीचे आहे.”

Loading...

मौलाना खलील रहमान नूरी यांचा विरोध

मौलाना पुढे म्हणाले, ‘अशा वक्तव्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे वातावरण बिघडू शकतं…’, ते असं देखील म्हणाले की, FIR दाखल केल्यामुळे विरोध टोकाला जाऊ शकतो… नूरी यांनी असं देखील सांगितलं की, ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक मार्ग आता ठरला आहे, आधी काही वादग्रस्त बोला… त्यानंतर केसचा सामना करा… माफी मागी आणि अखेरीस प्रकरण मिटवा…’, असं देखील मौलाना म्हणाले.

 

 

समय रैना यांच्या शोवरून नवा वाद

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप व्हायरल होताच, अनेक प्रेक्षकांनी समय रैना याच्यावर टीका केली, कारण त्याने आपल्या पंचलाईनमध्ये धार्मिक ओळखीचा संदर्भ दिला होता. एका नेटकऱ्यांने लिहिलं, “समय रैना यांना त्यांच्या शोमध्ये मुस्लिमांना लक्ष्य केलं. त्यांच्या मते, ‘कझिन’ म्हणजे ‘पती’ होय.”

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा समय रैना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या पहिल्या सीझनमध्ये देखील समय वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. शोमध्ये रणवीर इलाहाबादिया याने एका स्पर्धकाला आई – वडिलांबद्दल असं काही विचारलं, जे अनेकांना आवडलं नाही. तेव्हा समय याच्यावर FIR देखील दाखल करण्यात आलेल्या. आता पुन्हा सयम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us