AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Saraf: लॅम्बोर्गिनीच्या व्हिडीओवर अखेर अशोक सराफ स्पष्टच बोलले; बसू दे कुठल्याही गाडीत पण..

एकीकडे चित्रपटाची चर्चा आणि दुसरीकडे लॅम्बोर्गिनीतील व्हायरल एआय व्हिडीओवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया, यामुळे अशोक मामा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Ashok Saraf: लॅम्बोर्गिनीच्या व्हिडीओवर अखेर अशोक सराफ स्पष्टच बोलले; बसू दे कुठल्याही गाडीत पण..
अशोक सराफImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2026 | 8:45 AM
Share

Ashok Saraf: मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अशोक सराफ. आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने त्यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांना चाहते प्रेमाने ‘अशोक मामा’ म्हणतात. सध्या ते त्यांच्या ‘आदि अनंत’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांचा एक एआय व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली होती. आता स्वतः अशोक सराफ यांनी या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय होता अशोक मामांचा व्हायरल व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अशोक सराफ एका आलिशान लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करताना दिसत होते. व्हिडीओमध्ये अशोक मामा अगदी ऐटीत चालत येतात आणि लॅम्बोर्गिनी कारजवळ थांबतात. त्यानंतर गाडीत बसण्यापूर्वी ते आपल्या पायातील चपला बाहेर काढतात. विशेष म्हणजे, त्या चपला तिथेच न ठेवता स्वतः हाताने उचलून गाडीत ठेवतात आणि मग कारमध्ये बसतात. त्यांच्या या कृतीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. अनेकांना सुरुवातीला हा व्हिडीओ खरा असल्याचं वाटलं. मात्र, नंतर हा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. या व्हिडीओमधील लॅम्बोर्गिनीसारखी आलिशान गाडी आणि अशोक मामांची साधी राहणी यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली.

पहा तो व्हायरल व्हिडीओ-

अशोक मामांची प्रतिक्रिया

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अशोक सराफ यांना त्यांच्या व्हायरल एआय व्हिडीओबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही तुमचा व्हायरल झालेला एआय व्हिडीओ पाहिलात का? असं त्यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी अतिशय मिश्कील आणि खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, “तो एआय असला तरी त्यात एक माझा स्वभाव दाखवलेला आहे. बारीकसा एकदम… चप्पल बाहेर काढतो आणि ती चप्पल स्वतः उचलून आत ठेवतो. म्हणजे बसू दे कुठल्याही गाडीत… माणूस तोच आहे.”

त्यांच्या या उत्तराने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एआय व्हिडीओ असला तरी त्यामध्ये दाखवण्यात आलेली स्वतःची सवय आणि साधेपणा अशोक मामांनी अचूक ओळखला. एखादी गाडी कितीही महागडी असली तरी आपला स्वभाव आणि सवयी बदलत नाहीत, हेच त्यांनी आपल्या उत्तरातून अधोरेखित केलं.

दरम्यान, अशोक सराफ सध्या ‘आदि अनंत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच जादू प्रेक्षकांवर आहे. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेला ते आपल्या अभिनयाने वेगळं परिमाण देतात. त्यामुळे त्यांच्या नव्या चित्रपटाबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Follow Us
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...