Samay Raina On Nawazuddin : ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारु प्यायला, वेश्या महिलांसोबत…’, समय रैनाने कली अभिनेत्याची पोलखोल!

Samay Raina On Nawazuddin : कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने हजेरी लावलेली. यावेळी समय याने अभिनेत्याला रोस्ट केलं.

Samay Raina On Nawazuddin : नवाजने ड्रग्स घेतले, दारु प्यायला, वेश्या महिलांसोबत..., समय रैनाने कली अभिनेत्याची पोलखोल!
Samay Raina
| Updated on: Sep 19, 2026 | 1:36 PM

Samay Raina On Nawazuddin : वादग्रस्त परिस्थितीतून सुटल्यानंतर कॉमेडियन समय रैना याने दमदार कमबॅक केलं आहे. नेटफ्लिक्सवर ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा लेटेस्ट एपिसोड प्रदर्शित झाला असून, पॅनलवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता भुवन बाम, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा, कॉमेडियन कैस्तुभ उपस्थित होते. यावेळी समय याने यावेळी त्याच्या अनोख्या अंदाजात सर्वांना रोस्ट केलं. एवढंच नाही तर, ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजचं कौतुक करत नवाजुद्दीन याला देखील रोस्ट केलं… समय म्हणाला, तो डेग्स घेऊन आणि दारु प्यायल्यानंतर सेटवर यायचा…

‘सेक्रेड गेम्स सीरिज’ आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी

यावेळी समय रैना याने ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजचं कौतुक केलं आणि नवाजुद्दीन सिद्दिकी याच्याबद्दल म्हणाला, ‘सीरिजमध्ये नवाज सरांनी ड्रग्स घेतलं, दारु प्यायचे… वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे त्यानंतर सेटवर पोहोचायचे…’, पुढे समय याला उत्तर देत नवाज म्हणाला, ‘या शोसाठी देखील अशीच काहीशी तयारी करुन आलो आहे.’. यावर समय म्हणतो, ‘सर तुम्ही विचार करुन बोला, या सीटवर खूप काही घडलेलं आहे…’.

 

 

नवाजुद्दीन याला रोस्ट केल्यानंतर समय याने त्याचा मोर्चा भुवन बामच्या दिशेने वळवला. भुवन याला देखली समय याने  चांगलंच रोस्ट केलं.  समय भुवनला म्हणाला, ‘अखेर तू युट्यूबवर आलास..’, त्यानंतर समय पुढे विचारतो, ‘तू यूट्यूब का सोडल? समय म्हणतो, ‘मी सोडलं, कारण तुला पळता येईल…’, सध्या एपिसोड सर्वत्र चर्चेत आहे.

सांगायचं झालं तर, नेटफ्लिक्ससोबतच युट्यूबवर देखील एपिसोड पोस्ट करण्यात आला आहे. तर 2 तासांत एपिसोडला 2 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. यावर एक नेटकरी कमेंट करत म्हणतो, ‘नवाज भाई विचार करतोय, कोणतीच रिस्क आता घेणार नाही.’, दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘भुवन आणि नवाजुद्दीन काहीही बोलताना काळजी घेताना दिसत आहेत.’

 

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us