Sanjay Gupta daughter: संजय गुप्ता यांच्या निधनानंतर मुलीने हे काय केलं? अश्लील इशारे करत… Viral Video पाहून नेटकरी संतापले

Sanjay Gupta daughter: सध्या सोशल मीडियावर दिवंगत चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांच्या लेकीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने जे काही केले आहे ते पाहून नेटकरी संतापले आहेत.

Sanjay Gupta daughter: संजय गुप्ता यांच्या निधनानंतर मुलीने हे काय केलं? अश्लील इशारे करत... Viral Video पाहून नेटकरी संतापले
Sanjay Gupta
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 8:01 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांचे अचानक निधन झाले. या दुःखद बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या निधनानंतर अनेक दिग्गज कलाकारांनी अंतिम संस्कारात सहभागी होऊन त्यांना अखेरची मानवंदना दिली. मात्र, या दुःखाच्या वातावरणातच त्यांच्या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत संजय गुप्ता यांची मुलगी कारमध्ये बसलेली दिसते. कारभोवती अनेक पॉपराझी जमलेले आहेत. कारमध्ये बसलेली असताना ती पॉपराझींकडे पाहून वारंवार अश्लील इशारे करताना दिसते. त्यानंतर ती कपड्याने स्वत:चे तोंड झाकून घेते. पण तिचे तोंड झाकले असले तरी ती हसताना दिसत आहे. ड्रायव्हर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ती पुन्हापुन्हा तेच इशारे करत राहते. हा व्हिडीओ पाहून युजर्स भडकले आहेत.

Loading...

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, वडिलांच्या निधनानंतरही ती हसत कशी आहे? काहींनी या वर्तनाला अत्यंत अशोभनीय आणि असंवेदनशील म्हटले आहे.

संजय गुप्ता यांचे निधन कसे झाले?

संजय गुप्ता यांच्याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा वर्सोवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील त्यांच्या घरात ही घटना घडली. घरातच त्यांचे संतुलन बिघडले आणि ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मते, संजय गुप्ता आपल्या बंगल्यात पत्नी, दोन मुले आणि एक घरकाम करणाऱ्या सहाय्यकासोबत राहत होते. अपघाताच्या वेळी घरातील सर्वजण झोपलेले होते. त्यामुळे शनिवारी सकाळीच या घटनेची माहिती कुटुंबीयांना कळली. कुटुंबाने या प्रकरणात कोणताही संशय व्यक्त केलेला नाही आणि कोणतीही तक्रारही दाखल केलेली नाही.

या घटनेनंतर संजय गुप्ता यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त होत असतानाच मुलीच्या या वर्तनामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी म्हटले आहे की, अशा दुःखाच्या प्रसंगीही संवेदनशीलता दाखवणे आवश्यक होते. हा व्हिडिओ अजूनही व्हायरल होत असून लोकांच्या प्रतिक्रियांची संख्या वाढत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us