कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे…माधुरी दीक्षितच्या ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टिंगवर संजय मोनेंची नाराजी; मांडलं परखड मत
Sanjay Mone On Madhuri Dixit : संजय मोने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या होस्टिंगवर नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन करत आहे. यापूर्वी मराठी अभिनेते सचिन खेडेकर 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन करायचे.
मात्र, आता माधुरी या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार म्हटल्यावर चाहत्यांनी यावर आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली.
माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय, हे मराठी अभिनेते संजय मोने यांना रुचलेलं नाही. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
संजय मोने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, 'का कुणास ठाऊक पण, आज दीक्षित बाईंचा कार्यक्रम बघितला आणि एक जुनी मराठी म्हण आठवली "कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी"
'त्यापेक्षा सचिन खेडेकर तोच कार्यक्रम अप्रतिम सादर करायचे, असं संजय यांनी म्हटलं आहे. संजय मोने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट्स संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.