आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या रिलेशनवर सारा अली खान हिने सोडले माैन, थेट म्हणाली, माझ्याकडे…

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले, यांचे फोटो तूफान व्हायरल झाले.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या रिलेशनवर सारा अली खान हिने सोडले माैन, थेट म्हणाली, माझ्याकडे...
| Updated on: Nov 04, 2023 | 2:53 PM

मुंबई : कॉफी विथ करण सीजन 8 धमाका करताना दिसत आहे. आता याचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो पाहून अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. करण जोहर याच्या या शोमध्ये येणाऱ्या एपिसोडमध्ये सैफ अली खान याची लेक सारा अली खान आणि चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे या दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी सारा अली खान आणि अनन्या पांडे मोठे खुलासे करताना दिसणार हे नक्कीच आहे.

विशेष म्हणजे कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये चक्क अनन्या पांडे हिच्या रिलेशनवर भाष्य करताना सारा अली खान ही दिसणार आहे. यावेळी करण जोहर हा सारा अली खान हिला म्हणतो की, असे तुझ्याकडे काय नाही ते अनन्या पांडे हिच्याकडे आहे. यावर सारा अली खान हिचे उत्तर ऐकून सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

सारा अली खान हिने थेट म्हटले की, माझ्याकडे एक नाइट मॅनेजर नाहीये. सारा अली खान हिचे हे उत्तर ऐकून अनन्या पांडे ही लाजताना दिसत आहे. नाइट मॅनेजर ही बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याची फेमस वेब सीरिज आहे. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे एकमेकांना डेट करत असल्याचे काही दिवसांपासून सतत सांगितले जातंय.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचा साखरपुडा हा लवकरच पार पडणार असल्याची तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये फिरताना दिसले.

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा काही दिवसांपूर्वी लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. मात्र, या चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अनन्या पांडे हिच्यावरच फोडण्यात आले. विशेष म्हणजे अनन्या पांडे ही नेहमीच सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते.