
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही लग्झरी गाड्या सोडून चक्क रिक्षाने प्रवास करताना दिसली.
सारा अली खान ही बांद्रा परिसरात शाॅपिंग करताना काही दिवसांपूर्वीच दिसली. सारा अली खान आणि विकी काैशल याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सारा अली खान आणि विकी काैशल हे धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडली. या चित्रपटाने धमाकेदार अशी कामगिरी केली.
सारा अली खान आणि विकी काैशल हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. सारा अली खान ही सध्या विदेशात धमाल करताना दिसतंय. सारा अली खान ही विदेशात आपल्या आई आणि मित्रांसोबत गेलीये. सारा अली खान हिने विदेशातील काही अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसतंय.
काही खास फोटोंसोबत सारा अली खान हिने एक व्हिडीओ देखील शेअर केल्या. या व्हिडीओमध्ये सारा अली खान हिच्याकडे अत्यंत मोठ्या अशा बॅग दिसत आहेत. यावेळी सारा अली खान ही एकटीच आपल्या बॅग ट्रेनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतंय. या बॅग इतक्या जास्त मोठ्या आहेत की, सारा अली खान हिची मदत करताना एक मुलगा दिसतोय.
दुसरीकडे सारा अली खान हिची आई व्हिडीओ तयार करण्यात बिझी दिसतंय. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, इतक्या मोठ्या बॅग कशाला सारा उचलत आहे. एकाने लिहिले की, सैफ अली खानच्या लेकीला अशाप्रकारे विदेशात बॅग उचलताना पाहून फार जास्त वाईट वाटले.